प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमी 30 वर्षाचा असून माझ्या अाणि माझ्या सासूच्या वयात फक्त 4 वर्षाच अंतर अाहे..ती विधवा अाहे .माझ बायकोवर जेवढ प्रेमअाहे तेवढच सासूवर प्रेम अाहे.मी ह्याबद्दल सासूशी बोलायच म्हणतोय..काय करु मला माहित नाही हे चूक अाहे की बरोबर

1 उत्तर

कुणावर प्रेम असण्यात, तशी भावना, ओढ एखाद्या व्यक्तीबद्दल प्रकर्षाने जाणवण्यात वावगे काही नाही. पण आपली ही जी भावना आहे ती नेमकी काय आहे, ती निरपेक्ष आहे की या नात्याकडून काही अपेक्षा आहेत, तुम्हाला स्वतःला ही भावना व्यक्त करण्यातून काय साध्य करायचे आहे या सर्वांचा विचार तुम्ही करावा असे वाटते. विशेषतः तुमचे तुमच्या सासूशी सून/जावई म्हणून असलेले नाते पाहता; हे प्रेम आणि प्रेमाची तुम्हाला हवी असलेली अभिव्यक्ती तुमच्या नातेसंबंधात अनेक अडचणी उभ्या करू शकते. तुमच्या जोडीदाराची प्रतिक्रिया काय असू शकते, तुमच्या जोडीदाराशी असलेल्या नात्यावर काय परिणाम होऊ शकतात याचाही तुम्ही विचार करावा असे वाटते. अनेकदा माणसं कोणाला काही कळणार नाही, कळू द्यायचे नाही अशा पद्धतीने आपले नाते संबंध तयार करतात, परंतु यात खूप धोके असतात हे तुम्हाला कळत असणारच. तेंव्हा विचार करा आणि आपल्या भावनांशी प्रामाणिक रहा एवढेच आम्ही सांगू शकतो..

आपले उत्तर प्रविष्ट करा

2 + 15 =