आपल्याकडे पुरेसे लेडीज डॉक्टर नाहीत हा अनेक महिलांचा प्रश्न आहे. पण आसपासच्या परिसरात लेडीज डॉक्टर नसतील तर जेन्ट्स डॉक्टरकडे जाण्याशिवाय पर्याय नसतो, हेदेखील खरे आहे.
तुमच्या मनात जेन्ट्स डॉक्टरविषयी शंका का आहे ? इतर कोणाला त्या डॉक्टरविषयी तसा अनुभव आला आहे का ? एखादा विशिष्ट डॉक्टरविषयी तसा अनुभव असेल, शंका असेल तर दुसऱ्या डॉक्टरकडे जा.
आणि तुम्हाला सर्वच जेन्ट्स डॉक्टरांबद्दल भीती, शंका वाटत असेल तर ती मात्र दूर करावी लागेल. सगळेच डॉक्टर वाईट नसतात. तुमच्या सुरक्षेसाठी आणि समाधानासाठी तुमच्या जोडीदाराला, कुटुंबातील, नात्यातील एखाद्या व्यक्तीला, मैत्रिणीला घेऊन जा. एकटे जाऊ नका.
मनातील शंका, भीती दूर करा आणि निर्धास्त राहा. तपासणी तर करावी लागेलच ना ?
काळजी घ्या.