प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमुखमैथुन करताना तोंडात जखम म्हणजे तोंड येणे याला जखम म्हणता येईल का आणि तोंड आल्यावर मुखमैथुन केल्यावर एडस चा धोका असु शकतो का
1 उत्तर

शरीरातील स्रावांमधून एचआयव्हीची लागण एका व्यक्तीकडून दुसऱ्याला होऊ शकते. एचआयव्ही लैंगिक संबंधातून आणि इतर मार्गानेही पसरतो. रक्त, वीर्य, वीर्याच्या आधी बाहेर येणारा स्राव, योनीस्राव, आईचं दूध या स्रावांमधून एचआयव्हीचा विषाणू दुसऱ्याच्या शरीरात जातो. लिंगसार्गिक आजार असतील तर एचआयव्ही होण्याचा धोका वाढतो.

एचआयव्हीची लागण झालेल्या व्यक्तीसोबत कंडोम न वापरता केलेल्या लैंगिक संबंधातून (संभोग, मुख मैथुन आणि गुदा मैथुन) लागण होऊ शकते.

तोडांतील जखम म्हणजे जसं हिरड्यांमधून रक्त येत असेल किंवा तोंड आल्यावर त्याच्यातून रक्त येत असेल थोडक्यात ज्या जखमांमधून रक्त येतं अशा जखमा एचआयव्हीची लागण होण्याकरता धोकादायक असतात.

(एचआयव्हीची लागण होण्याचे बिगर लैंगिक मार्ग म्हणजे

निर्जंतुक न केलेल्या इंजेकशनच्या सुया,

दूषित रक्त आणि

प्रसूतीच्या वेळी आईकडून बाळाला एचआयव्हीची लागण होऊ शकते.)

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 13 =