प्रश्नोत्तरेमुखमैथुन करावे की नाही

1 उत्तर

सर्वप्रथम तुमचे एका गोष्टीवर तुमचे लक्ष वेधावे वाटते. स्त्रीच्या लैंगिक अवयवाला ’योनी’ आणि पुरुषांच्या लैंगिक अवयवांना  ‘लिंग आणि वृषण’ असे अधिक योग्य आणि सोपे, सुटसुटीत शब्द उपलब्ध आहेत. मुख्य म्हणजे त्यांचा शिव्यांमध्ये किंवा हीन अर्थी वापर सहसा केला जात नाही.
आता वळूया तुमच्या उत्तराकडे. जोडीदारांनी एकमेकांच्या लैंगिक अवयवांना जिभेने चाटणे अथवा लिंग तोंडात घेणे याला  मुखमैथुन असं म्हणतात. जर दोन्ही जोडीदारांची इच्छा असेल, दोघांनाही त्यातून आनंद मिळत असेल तर त्यात गैर काही नाही. मात्र मुखमैथुन करताना योनीचा भाग स्वच्छ असायला हवा. योनीमार्गामध्ये कधी कधी जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. असा काही जंतुसंसर्ग झाला असेल तर त्यावर उपाय करावा. अशा वेळी मुखमैथुन करू नये. काही जणांना मुखमैथुन करणे किळसवाणे वाटू शकते. त्यामुळे दोन्ही जोडीदारांना यातून आनंद मिळतोय का याचा विचार करणे आवश्यक आहे. योनीतील स्राव शरीरात गेला तरी त्याने काहीही धोका पोहचत नाही.

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 15 =