प्रश्नोत्तरेमुलगा होण्यासाठी कधी सेक्स करावा

1 उत्तर

हे ठरवण्याचा कोणताही शास्त्रीय मार्ग उपलब्ध नाही. मुळात मुलगाच का हवा? मुलगी का नको ? याबद्दल सर्वप्रथम विचार करण्याची गरज आहे. पुरुषप्रधान भारतीय समाजात वर्षानुवर्षे स्त्रियांचं स्थान हे दुय्यम राहिलं आहे. लिंगनिवड करून फक्त मुलांनाच जन्माला घालण्याच्या मानसिकतेमुळे मुलींचे प्रमाण कमी कमी होत आहे. ही सर्वांसाठीच एक धोक्याची घंटा आहे.

शास्त्रीयदृष्ट्या सांगायचे झाले तर स्त्रीकडे XX तर पुरुषाकडे XY ही गुणसूत्र असतात. पुरुषाकडून Y आणि स्त्रीकडून X गुणसूत्र आले की मुलगा होतो. पुरुषाने गर्भधारणेवेळी कोणते गुणसूत्र पाठवायचे हे खरंतर पुरुषालाही ठरवता येत नाही. स्त्रीने ठरविण्याचा तर प्रश्नच येत नाही. मुलगा जन्माला येण्यासाठी प्राधान्य देणं आणि स्त्रीचा जन्मच नाकारणं हा स्त्रियांवर होणारा अन्याय आहे आणि आपण त्याला विरोधच केला पाहिजे.

प्रसूतीपूर्व लिंग निदान प्रतिबंधक कायदा गर्भलिंग निदान करणे हा दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/pcpndt/

Priyanka replied 1 year ago

आपल्याकडे जर 2 च अपत्य असावीत असा नियम असेल तर तो एक मुलगी आणि एक मुलगा असावा असं मला वाटतं. आणि ज्या लोकांना पहिली मुलगी आहे त्यांनी दुसऱ्यावेळी मुलगा असावा यासाठी प्रयत्न केले तर ते चुकीचं समजू नये. मुलगी मुलगा दोन्हीही तेवढेच महत्वाचे आहेत. त्यामुळे एका कुटुंबात 2 च अपत्य असावीत असा नियम असेल तर ती मुलगा आणि मुलगी दोन्ही असावीत

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 10 =