योनी asked 7 years ago

माझ्या मैत्रिणी ची योनी पूर्ण पणे तयार नाही झाली आहे .तिला मासिक पाळी च्या वेळी खूप त्रास होतो.कधी कधी 2-2 महिने मासिक पाळी येत नाही.आम्ही काय करू

1 उत्तर
Answer for योनी answered 7 years ago

मैत्रिणीची योनी पूर्णपणे तयार झाली नाही हे तुम्ही कशावरून म्हणत आहात ? तुम्हालाच तसे वाटते की डॉक्टरांनी तसे निदान केले आहे ? हे तुमच्या प्रश्नातून लक्षात येत नाही. तुम्हाला अशी काही शंका वाटत असेल तर कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि मगच काय ते ठरवा.

मासिक वेळी त्रास होणं किंवा पाळी मधील अनियमितता याची वेगवेगळी कारणं आहेत. त्याविषयी खाली महिती देत आहे.

१. पाळीदरम्यान होणारा त्रास

अनेक स्त्रियांची ही तक्रार असते. पाळीच्या दरम्यान गर्भाशयाच्या आकुंचन प्रसारण पावण्याने ओटीपोटात दुखते. चालणे किंवा एखाद दुसरा व्यायाम केला तर स्नायूना आराम मिळतो. अशा दुखण्यावर घरातल्या घरातही काही उपाय करता येतात. वेदना थांबण्यासाठी शेक घेता येईल. आले घालून केलेला चहा, झेंडूच्या पाकळ्यांचा काढा (पाळीच्या दोन दिवस अगोदरपासून), गाजरांच्या बियांचा काढा असे काही उपाय करता येतील. पाळीच्या किंवा अन्डोत्सर्जनाच्या दिवसात काही शारीरिक किंवा भावनिक त्रास स्त्रियांना जाणवतात. उदा. छाती जड वाटणे, कंबर भरून येणे, हात पाय चेहऱ्यावर सूज, डोके दुखी, पोट-पाठ दुखी किंवा चिडचिड, खिन्नता, रडू येणे. संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यांनी अशा अनेक समस्यांवर सहजी उपाय शोधता येतो. हे दुखणे सहन करण्यासारखे नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. जंतूसंसर्ग असेल तर मात्र औषधांचा कोर्स पूर्ण करावा लागतो. खाली आपल्याच वेबसाईट वरील काही उपयोगी लेखांची लिंक देत आहोत.

https://letstalksexuality.com/category/our-bodies/

https://letstalksexuality.com/fertility-cycle-changes-in-the-body/

आपले उत्तर प्रविष्ट करा

2 + 18 =