काही विशिष्ट परिस्थितीमध्ये नैसर्गिकरीत्या योनीतून थोडे जास्त पांढरे पाणी जाते. लैंगिक संबंधाच्या वेळेस योनीतून पांढरे पाणी जास्त प्रमाणात जाते आणि हे नैसर्गिक आहे यात चिंता करण्याचे काहीही कारण नाही. अंगावरून नैसर्गिकरीत्या जाणाऱ्या पांढऱ्या पाण्याचा रंग आणि वास बदलल्यास आजाराचे लक्षण समजून त्यावर उपचार घेतले पाहिजेत. स्वतःच्या नैसर्गिक स्त्रावाचा वास आपल्या परिचयाचा असतो. नेहमीपेक्षा वेगळा दुर्गंधीयुक्त वास असल्यास आजाराचं लक्षण समजून त्यावर उपचार केले पाहिजेत.
कोणत्या परिस्थितीमध्ये योनीतून पांढरे पाणी जाते हे समजून घेणे आवश्यक आहे. अंगावरून जाणारा पांढरा स्राव याविषयी माहिती असेल तर हा स्राव नैसर्गिक आहे की, आजारामुळे त्यात काही बदल झाला आहे हे समजून घेता येईल. याविषयी जाणून घेण्यासाठी खालील लिंकवरील लेख वाचा.