प्रश्नोत्तरेलग्नाच्या नावाखाली स्वत:च्या मनाने जर संबंध ठेवले अन नंतर नातं तुटलं तर बलात्काराचा गुन्हा का लावला जातो?

1 उत्तर

 
कोणतही नातं तयार होत असताना त्याला काही आधार असतात. ज्या आधारावर नातं तयार होतं तो आधारच जर नाहीसा झाला तर अशी नाती टिकून राहणं अवघड असतं किंवा अशा नात्यांना नवीन आधार शोधावा लागतो. एखाद्या व्यक्तीसोबत लग्न करण्याच्या अटींवर लैंगिक संबंध ठेवले असतील आणि नंतर लग्नाला नकार दिला तर ती नक्कीच फसवणूक आहे. अशा फसवणूकीच्या गुन्ह्यांसाठी कायद्याने शिक्षा देखील होवू शकते आणि ती योग्यही आहे. कोणतेही लैंगिक संबंध ठेवताना समंती आवश्यकच असते. कायद्यानुसार जर समंती (परवानगी) काही आमिष किंवा मोबदला दाखवून मिळवली असेल तर अशी समंती ग्राह्य धरली जावू शकत नाही. एखादी व्यक्ती लग्नाचे आमिष दाखवून शरीर संबंध ठेवत असेल आणि नंतर लग्न करण्यास नकार देत असेल तर समोरील व्यक्तीची लैंगिक संबधासाठी परवानगी आहे असे म्हणता येणार नाही कारण ही फसवून किंवा  खोटं बोलून मिळवलेली परवानगी आहे.  म्हणून अशा केस मध्ये कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल होवू शकतो. अशा गोष्टी टाळण्यासाठी नात्यांमध्ये पारदर्शकता, विश्वास असणं आणि ते टिकवून ठेवणं महत्वाचं असतं.

आपले उत्तर प्रविष्ट करा

11 + 7 =