प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsलग्नाला २ महिने झाले बायको सेक्स करून देत नाही .रोज बोलते आज नको उद्या करा ,ती करून देत नाही त्यामुळे मला खूप त्रास होतोय मी काय करायला हवं .तिच्याशी खूप बोललो विचारलं काही प्रॉब्लेम आहे का ,तर नाही बोलते कृपया मदत करा

लग्नाला २ महिने झाले बायको सेक्स करून देत नाही .रोज बोलते आज नको उद्या करा ,ती करून देत नाही त्यामुळे मला खूप त्रास होतोय मी काय करायला हवं .तिच्याशी खूप बोललो विचारलं काही प्रॉब्लेम आहे का ,तर नाही बोलते

कृपया मदत करा

1 उत्तर

मित्रा, तुला त्रास होणं अगदी स्वाभाविक आहे. तुझा समजूतदारपणा आणि याचंही कौतुक. कारण वैवाहिक जबरदस्ती, बलात्कार याचं आपल्या समाजामध्ये खूप प्रमाण असताना तू अत्यंत सामंजास्याने आणि संयमाने या सगळ्याला सामोरं जात आहेस ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि याचा तुझं आणि तुझ्या जोडीदाराचे नातं, मैत्री घट्ट होण्यामध्ये नक्की मदत होईल.

यावर संवाद आणि संवाद हाच एकमेव मार्ग आहे. निदान सुरुवातीच्या काळात तरी. तिच्याशी मैत्री कर आणि तिची काय अडचण आहे, हे समजून घ्यायचा प्रयत्न कर. तिला सेक्सची भीती वाटते का? गर्भधारणेची भीती वाटते का? सेक्सची इच्छा होत नाही का ? यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा कर. तुझ्या अपेक्षा, तुला होणारा त्रास अगदी सच्चेपणानं सांग. तिची अडचण समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न देखील तिला कळू देत. गरज पडल्यास, तिच्याशी संवाद साधण्यासाठी दुसऱ्या कोणाचीतरी मदत घेता येईल, डॉक्टर, सायकोलॉजीस्ट वगैरे; याविषयीही तिच्याशी बोल.

लैंगिक संबंध सुखकर आणि आनंददायी लैंगिक संबंधांसाठी संमती, विश्वास, आदर आणि सुरक्षितता या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत.

आपले उत्तर प्रविष्ट करा

5 + 17 =