प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsलग्न झालं नाहीये पण संबंध ठेवायचे आहेत तिलाही आणि मलाही

तिच्या घरची मंडळी माझी जात खालची म्हणून आमचं लग्न होऊ देत नाहीयेत. आमच्या प्रेमाच्या नात्याला आठ वर्ष झाली, वेडंवाकडं पाऊल उचलायच नाही अस आम्ही दोघांनी ठरवलंय. आज आमचं दोघांचं वय 28 वर्ष. ह्या वयात शारीरिकसंबंध नाही आले तरच नवल. तसे आमच्यात सुद्धा आहेंत. लग्न न झाल्या कारणाने आम्हाला हॉटेल, रिसॉर्ट किंवा एखाद्या लॉंज वर जाऊन आमची शारीरिक भूक भागवावी लागते. पण अश्या ठिकाणी जाताना आम्हाला नेहमीच जीव मुठीत घेऊन जावं लागत, मनात एक भीती असते कि कुणी पाहणार तर नाही ना , किंवा पोलिसांची रेड तर पडणार नाही ना ह्या हॉटेल किंवा लॉंज वर??

कृपया आपण मार्गदर्शन करावे कि अश्या ठिकाणी जाणे अयोग्य आहे कि योग्य आहे, आणि पोलिसांना कारवाई करण्याचा हक्क आहे का? जर हे दोघांच्या संमतीने घडत असेल?

शक्य असल्यास शारीरिक संबंध ठेवण्या साठी योग्य ते पर्याय सुचवावेत, जिथे कोणी आम्हाला त्रास द्यायला येणार नाही.

1 उत्तर

लॉज, बाग बगीचा, डोंगर ह्या जागा लैंगिक संबंधांसाठी धोकादायक ठरू शकतात. तुमचा गैरफायदा घेतला जावू शकतो किंवा लुबाडण्याच्या घटना घडतात. दुसरं म्हणजे ह्या जागा अशा नाहीत जिथे कुणालाही ‘सहज’ वाटेल. अवघडलेपण येणारच. तेव्हा खूप खात्री असेल आणि तिला योग्य वाटत असेल तरच अशा जागी जाण्याचा निर्णय घ्या. आपल्या जगात मुलामुलींना एकांत मिळू शकेल अशा जागा नसणं ही एक मोठी शोकांतिका आहे. त्यात आजकाल संस्कृतीच्या नावाखाली गोंधळ घालणारे मोकाट सुटलेले असल्यामुळे सावध असा.

मित्रा पर्याय मात्र तुझे तुलाच शोधावे लागतील. तुमच्या दोघांना सुरक्षित वाटेल अशी ठिकाणं शोधणं हाच यावर एकमेव उपाय आहे. लैंगिक संबंध ठेवताना प्रत्येक वेळी दोघांचीही संमती आणि सुरक्षितता मात्र महत्वाची. नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी योग्य ते गर्भनिरोधक वापरा. सेक्स ही एक जबाबदार कृती आहे त्यामुळं त्याची जबाबदारी घ्या.

सगळ्यात महत्वाचं म्हणजे, अशा संबंधांमध्ये भावनिक गुंतवणूक होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे तुमच्या नात्याच्या भवितव्याविषयी दोघं मिळून काय ते ठरवा. नंतर गुंतागुंत नको. दोघंही सज्ञान आहात आणि निर्णय घेण्यास स्वतंत्र आहात.

तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा !

आपले उत्तर प्रविष्ट करा

17 + 0 =