प्रश्नोत्तरेलिंग लहान आसेल तर काय करायला पाहीजे ?

लीग लाहान आसेलतर काय करायला पाहीजे

1 उत्तर
Answer for ा answered 8 years ago

लिंगाची लिंगाची जाडी, लांबी आणि आकार किती असावा यासाठी काही विशेष मापदंड नाही. प्रत्येकाच्या लिंगाचा आकार आणि लांबी वेगवेगळी असते. शात्रीयदृष्ट्या सागायचे तर लिंग योनीत जाऊन त्यात शुक्राणू पोहचवण्याइतपत पुरेसे लांब असावे. लिंगाची जाडी, लांबी आणि आकार यात व्यक्ती परत्वे फरक असतो. सर्वसाधारणपणे उत्तेजित/ ताठरता आलेल्या लिंगाची लांबी ३- ५ इंच असते. लिंग किती मोठं आहे यापेक्षा ते ताठ होतं का, संबंधाच्या वेळी ते ताठ राहतं का किंवा लैंगिक सुख मिळतं का, तुमच्या जोडीदाराला तुम्ही लैंगिक सुख मिळवून देऊ शकता का हे जास्त महत्त्वाचं आहे. यात काही अडचण येत नसेल तर निश्चिंत रहा. काळजी करण्याचे काहीही कारण नाही. लिंगाचा आकार/साईझ वाढवण्याचा कोणताही शास्त्रीय उपाय  नाही. लिंगाच्या लांबीविषयी चर्चिले गेलेले वेबसाईटवरील इतर प्रश्नोत्तरे नक्की वाचा.

vilas replied 8 years ago

Ling Mothe karayche aslyas kay karave.?

I सोच replied 8 years ago

लिंगाचा आकार, लांबी आणि लैंगिक समाधान याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. शात्रीयदृष्ट्या सागायचे तर लिंग योनीत जाऊन त्यात शुक्राणू पोहचण्याइतपत पुरेसे लांब असावे. बहुतेक वेळा पौरुष आणि जोडीदाराचे समाधान करण्याची क्षमता यांचा संबध लिंगाचा आकार आणि लांबी यांच्याशी लावतात. पण हा गैरसमज आहे. सेक्स मध्ये लिंगाचा आकार नाही तर आनंद महत्वाचा असतो. सेक्समध्ये प्रत्यक्ष संभोगाबरोबरच प्रणय, स्पर्श, शारीरिक जवळीक आणि संभोग अशा विविध प्रकारच्या लैंगिक क्रियांचा समावेश होतो. यातून जोडीदार परस्परांना आनंद देऊ शकतात. लिंगाचा आकार आणि लैंगिक समाधान हा विषय प्रश्न उत्तरांमध्ये अनेकदा चर्चिला आहे. अधिक माहितीसाठी यासंबंधी प्रश्नउत्तरे अवश्य वाचा.
प्रत्येक पुरुषाच्या लिंगाची साईज वेगवेगळी असते. बाजारामध्ये लिंग वाढीसाठी जी औषधं उपलब्ध आहेत त्याच्या परिणांमांबाबत शंका आहेत. शिवाय अशा औषधांचे साईड इफेक्ट्सची निश्चित माहिती उपलब्ध नाही. मात्र तुला लिंगाची साईज वाढवण्याची गरज का वाटली? यावर विचार कर. लिंगाची साईज ठराविकच असावी असा कोणताही नियम नाही. त्याच्यामुळं संभोगच्या आनंदावर काहीही परिणामही होत नाही. कदाचित पॉर्न क्लिप पाहून किंवा लिंग वाढीच्या औषधांच्या जाहिरातीमुळं किंवा मित्रांच्या चुकीच्या सल्ल्यामुळं तुम्हाला लिंगाच्या साईजबद्दल प्रश्न पडला आहे का? यावर विचार करा. जर अजून काही प्रश्न पडला तर पुन्हा नक्की विचारा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

9 + 12 =