वजन वाढण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नयेत. पूरक आहार, व्यायाम आणि पुरेशी विश्रांती निरोगी जीवनासाठी आवश्यक असते. तुम्हाला काही आजार आहे का? तब्येतीसंबंधी काही तक्रार असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. काहीजणांची शरीरयष्टीच बारीक असते. आरोग्याच्या इतर काही तक्रारी नसतील काळजी करण्याचे कारण नाही.
तब्येतीसंबंधी काही तक्रार असेल तर निरोगी जगण्यासाठी, फीट राहण्यासाठी पूरक आहार, व्यायाम आणि पुरेशी विश्रांती जरुर घ्या. मात्र इतरजण बारीक आहे, बारीक आहे म्हणतात या दबावाखाली येऊन औषधे घेऊ नका. आपण जसे आहोत तसे खूप सुंदर आहोत. त्यामुळे स्वतःवर प्रेम करा.