प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsवय पन्नास, शरीरसंबध केले की योनित दाह, रक्तस्त्राव
1 उत्तर

वयाच्या 45-50 च्या आसपास कधी कधी त्याहीनंतर स्त्रीचं पाळीचक्र थांबतं याला मेनोपॉज असं म्हणतात. ही बाईच्या शरीरात होणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मेनोपॉज पाळीचक्र थांबतं याचं साधं कारण म्हणजे बीजकोषात बीजं तयार होणं थांबतं. प्रोजस्टेरॉनची निर्मिती पूर्णपणे थांबते. थोड्या फार प्रमाणात इस्ट्रोजन मात्र तयार होत राहतं. मेनोपॉजच्या काळात आणि त्यानंतर स्त्रीमध्ये काही शारीरिक आणि भावनिक बदल होत असतात. लैंगिक इच्छा आणि भावभावनाही बदलू शकतात. योनीतील ओलसरपणा आणि लवचिकपणा कमी होणं हा एक होणाऱ्या बदलांपैकी एक बदल आहे. योनिस्राव वंगण म्हणून काम करतो पण तो कमी झाल्याने शरीरसंबंध करताना योनीमध्ये दाह आणि रक्तस्राव होऊ शकतो. योनीतील ओलसरपणा वाढविण्यासाठी काहीजण जेलीचा वापर करतात. मेनोपॉजविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.

https://letstalksexuality.com/menopause/

आपले उत्तर प्रविष्ट करा

1 + 12 =