sir mi direct muddyavrch yeto..
majhya n majhya gf che (प्रेयसी) bhandan zale.
shabdik chakmak mule ha vaad zala.
ti ata call uchalyla, bolayla pn tyar nahi.
jevha pasun bhandan zale tevha pasun kahi krmt nahi ahe
karan tichya sobt bina bolych rahne he mla tri ashakya ahe.
tumhi majha problem smju shaksal ka nahi kinva mi te tumhala smjvu shklo ka nahi kay mahit!!
ti mhnali ki yapude mi tujsobt kdhich bolnar nahi.
pn ti pn majhyavr khup prem krte mla vishwas ahe
pn saddhya tri khup raagat ahe..
how can I convene her??
plz help
उत्तर देण्यात झालेल्या विलंबाबद्दल सर्व प्रथम क्षमस्व. मधल्या काळात तुमचे भांडण मिटले असेल अशी अशा आहे. तुमच्या दोघांच्या भावी आयुष्यासाठी आमच्या अनेक शुभेच्छा आणि परत असे भांडण होणार नाही अशी अपेक्षा.
तुमच्या प्रश्नाच्या संदर्भाने एक-दोन गोष्टी इथे लिहाव्या वाटतात. प्रेमातच नाही तर कुठल्याही नात्यात छोट्या मोठ्या कुरबुरी होतातच. आपण माणूस आहोत मशिन्स नाही. मुद्दा हा आहे आपण अशा परिस्थितीला कसा प्रतिसाद देतो. आपण लक्षात ठेवू या की प्रत्येक व्यक्तीला स्वतःची एक स्पेस हवी असते आणि तिचा इतरांनी आदर करायला हवा असतो. इतरांच्या एखाद्या गोष्टीचा राग येऊन काही काळ एकटं रहावं वाटणं स्वाभाविक आहे. अशा वेळी कुठलीही जोर जबरदस्ती कामी येत नाही नव्हे ती कधीच कामी येत नाही आणि आपण जर समानता, प्रेम, विश्वास ही मूल्य मानत असू तर जोर जबरदस्ती सारखे पर्याय आपले नाहीत. संवाद आणि जोडीदाराच्या प्रति आदर हेच आपले पर्याय. त्यामुळे यापुढे अशी स्थिती आली तर टेक अ चिल पिल. टेक ईट इझी. तुम्हीच म्हणालात तिचे तुमच्यावर प्रेम आहे असा तुम्हाला विश्वास आहे. मग झालं तर… आल इझ वेल…