माझं लग्न जुळत आहे काही वृद्ध मित्रांनी प्री-मॅरिटल कौंसिलिंग घेण्याबाबत सुचवले आहे. लग्नापूर्वी Pre-marital Counseling गरजेचे आहे का ? प्रत्यक्ष डॉक्टरांची भेट घेतली तर पूर्ण व योग्य मार्गदर्शन करतील का?
तुमच्या वृद्ध मित्रांनी विवाह पूर्व समुपदेशन घेण्याबाबत सुचवलेली बाब फारच प्रशंसनिय आहे. विवाह पूर्व समुपदेशन घेणे गरजेचेच आहे. त्यासाठी फक्त तुम्ही न जाता तुमच्या होणार्या जोडीदारालाही सुचवू शकता, हे तुमच्या पुढच्या वैवाहिक आयुष्यासाठी जास्त परिणामकारक व उपयुक्त होईल. असे समुपदेशन तुमच्या परिसरात कुठे होते याचा तुम्हाला शोध घ्यावा लागेल. काही सरकारी दवाखान्यात किंवा स्वयंसेवी संस्थामध्ये अशी सेवा पुरवली जाते. अथवा प्रत्यक्ष या विषयाशी संबंधित डॉक्टरांची भेट घेतली तर पूर्ण व योग्य मार्गदर्शन नक्की मिळेल.