प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsवेशा व्यवसाय करणाया महिलेला एडस असतो का?
1 उत्तर

एड्स ही आजाराची एक अवस्था आहे. या अवस्थेमध्ये शरीराची रोगप्रतिकार शक्ती पुर्ण नाहीशी होते. हा आजार होण्यासाठी एचआयव्हीचा विषाणू कारणीभूत असतो. शरीरातील स्रावांमधून एचआयव्हीची लागण एका व्यक्तीकडून दुसऱ्याला होऊ शकते. रक्त, वीर्य, वीर्याच्या आधी बाहेर येणारा स्राव, योनीस्राव, आईचं दूध या स्रावांमधून एचआयव्हीचा विषाणू दुसऱ्याच्या शरीरात जातो. एचआयव्ही लैंगिक संबंधातून आणि इतर मार्गानेही पसरतो. एचआयव्हीची लागण झालेल्या व्यक्तीसोबत कंडोम न वापरता केलेल्या लैंगिक संबंधातून (संभोग, मुख मैथुन आणि गुदा मैथुन) लागण होऊ शकते. लिंगसार्गिक आजार असतील तर एचआयव्ही होण्याचा धोका वाढतो.

एचआयव्हीची लागण होण्याचे बिगर लैंगिक मार्ग म्हणजे

• निर्जंतुक न केलेल्या इंजेकशनच्या सुया,

• दूषित रक्त आणि

• प्रसूतीच्या वेळी आईकडून बाळाला एचआयव्हीची लागण होऊ शकते.

एखादी वेश्या दरवेळी आरोग्याची काळजी घेऊन सुरक्षित लैंगिक संबंध ठेवत असेल तर तिला एचआयव्हीची लागण होवू शकत नाही. मात्र अनेकवेळा ग्राहकांचीच मागणीमुळं कंडोम न वापरता संभोग करावा लागतो. त्यामुळं अशा असुरक्षित संबंधांतून एचआयव्हीची लागण होण्याचा धोका जास्तच असतो. वेश्या व्यवसायामध्ये एचआयव्हीची लागण होण्याचं प्रमाण जास्त आहे. परंतू याचा अर्थ सर्वच वेश्यांना एचआयव्हीची लागण झालेली असते असा होत नाही.

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 11 =