mazya shishnache cover purn shishnazakat nahi
ardhe zakate v tyche tok ughade rahte
shishnacha khup vas yeto ?
शिश्न/लिंग यावरील त्वचा वरील भाग पूर्ण झाकत नाही याचबरोबर तुम्हाला सेक्सदरम्यान वेदना किंवा सूज येणे किंवा इतर काही त्रास होत आहे का? त्याचा जर काही त्रास नसेल काळजी करण्याचे कारण नाही.
लिंगाचा/विर्याचा नैसर्गिक, नेहमीसारखा वास येत असेल तर काळजी करण्याचे कारण नाही त्याव्यतिरिक्त काही त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. पुरुषांमध्ये जर लिंगसांसर्गिक आजाराची खालीलप्रमाणे काही लक्षणं दिसतात.
• लघवीच्या वेळी किंवा लैंगिक संबंधांच्या वेळी वेदना
• लिंगातून किंवा गुदद्वारातून पूसारखा स्राव
• जननेंद्रियांवर किंवा गुदद्वारावर फोड, पुळ्या, गाठी, व्रण
• जांघेमध्ये गाठी येणे, त्या फुटणे किंवा चिघळणे
• एका किंवा दोन्ही वृषणांमध्ये वेदना
लक्षात ठेवा
न घाबरता आणि लाजता डॉक्टरांची किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांची मदत घ्या.
इतर आजारांसारखेच हे देखील आजार आहेत आणि त्यांच्यावर उपचारदेखील आहेत.
वेळीच निदान झालं तर बहुतेक लिंगसांसर्गिक आजार बरे होऊ शकतात.
वेळीच उपचार झाले नाही तर मात्र काही आजारांचं घातक रोगांमध्ये रुपांतर होऊ शकतं.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.