शुक्राणूंची संख्या कमी आहे हे तुम्हाला नक्की कसं कळलं? याबद्दल प्रश्नामध्ये काहीही उल्लेख नाही. त्यामुळं उत्तर देताना शुक्राणू संदर्भातला महत्वाच्या भागावर फोकस केला आहे. गर्भधारणेसाठी शुक्राणूंची गरज असते. ज्यावेळी एक वीर्यस्खलन(वीर्य बाहेर येणं) होतं त्यावेळी त्यामध्ये लाखो शुक्राणू असतात. गर्भधारणेसाठी त्यातील एकाच शुक्राणूची गरज असते. वीर्यातील शुक्राणूंची संख्या कमी असेल तर गर्भधारणा होण्यामध्ये अडचण येवू शकते. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं फायदेशीर असतं. त्यांनी सांगितलेले उपाय उपयोग पडतील.
प्रश्नाचं उत्तर समाधानकारक वाटत नसेल तर पुन्हा नेमकेपणाणे प्रश्न विचारा.