प्रश्नोत्तरेशेटं काढावीत का ?

1 उत्तर

शेटं या शब्दासाठी  इथे ‘लैंगिक अवयवांच्या आजूबाजूचे केस’ हा पर्यायी शब्द वापरत आहोत. लैंगिक अवयवांच्या ठिकाणी केस येणे अगदी नैसर्गिक आहे. लैंगिक अवयवांच्या आजूबाजूचे केस लैंगिक अवयवांचं रक्षण करत असतात. लैंगिक अवयवांची स्वच्छता राखणंही जरुरीचं आहे. स्वच्छता ठेवण्यासाठी ते वाढू न देणं आणि त्यामध्ये घाण जमा होऊ न देणं गरजेचं असतं. लैंगिक अवयवांची स्वच्छता राखण्यासाठी हे केस कापले तरी चालतील. हे केस पूर्णपणे काढून टाकण्याची गरज नसते. केस कापताना लैंगिक अवयवांना कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. जसं टोकदार कात्री वापरु नये. तसंच ब्लेडचा वापर शक्यतो टाळावा. कात्रीचा वापर करून ते बारीक कापता येऊ शकतात.  ब्लेडने इजा होऊ शकते त्यामुळे त्याऐवजी कात्री वापरा. हर्बल किंवा इतर कोणत्याही क्रीममध्ये काही रसायनं असतात ज्याचा लैंगिक अवयवांच्या त्वचेवर परिणाम होऊ शकतो. त्यातून खाज आणि आग होऊ शकते. त्यामुळे क्रीमचा वापर टाळणं चागलं.

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 10 =