प्रश्नोत्तरेCategory: Private Questionसंभोगानंतरही लिंगावरची त्वचा मागे जात नाही

माझे वय 38 आहे माझ्या लग्नाला 12 वर्षे झाली आहेत माझ्या लिंगावरील त्वचा मागेजात नाही तसेच संभोग करताना बर्याच वेळा लिंगामध्ये ताठरता येतनाही व आमचा सेक्स 1 ते मी चालतो जर पत्नी च्या वर येउन सेक्स केल्यास केव्हाच समाधान मिळत नाही कारण लगेच शिग्घ्रपतन होते म्हणून पत्नी माझ्या वर येवून सेक्स करते याकारणाने पत्नी नाराज होऊन आमचा संसार तुटेल असे सारखे वाटते अशा गोष्टी ना कंटाळून पत्नी सेक्सला तयार नसते म्हणून मी खूप वेळा हस्तमैथुन करतो यामुळे माझा काँन्फीड्नट कमी झाला आहे तरी मला लवकर उपाय सुचवा

robheenny replied 2 years ago

We are the only ones living on our little country lane viagra and alzheimer’s the outcome of lesion size was considered, but the analyzed studies did not report it 13

Gajanan kurane replied 2 years ago

मला भेटा

1 उत्तर

काळजी करू नका. लिंगावरील त्वचा मागे न जाणे, ताठरता न येणे आणि शीघ्रपतन या अनेकांमध्ये आढळणाऱ्या समस्या आहेत आणि त्यावर उपाय देखील आहे. याविषयी एक एक करून जाणून घेऊ यात.

१. लिंगावरची कातडी मागे जात नाही. त्याविषयी बोलूयात. अनेकवेळा लैंगिक संबंधांच्या सुरुवातीच्या काळामध्ये लिंगावरची त्वचा मागे जाताना थोडाफार त्रास होऊ शकतो. परंतु हळूहळू हा त्रास कमी होत जातो आणि लिंगावरची त्वचा मागे जायला सुरुवात होते. त्यामुळं काळजी करण्याचं कारण नाही. हस्तमैथुन करताना किंवा संभोग करताना लिंगावरची त्वचा मागे न जाता त्रास होत असेल तर सुंता करणं आवश्यक असतं. सुंता करणे याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंकवरील लेख वाचा. https://letstalksexuality.com/male-circumcision/

२. लिंग उत्तेजित होत नाही किंवा ताठरता येत नाही. पहिलं आपण हे समजून घेऊया की पुरुषांच्या लिंगात ताठरपणा येतो म्हणजे काय होतं. लैंगिक उत्तेजना मिळाल्यामुळे मेंदू अशा वेळी रक्ताचा प्रवाह लिंगाच्या दिशेने वाढवतो आणि त्या प्रवाहाच्या दाबामुळे लिंगात ताठरता येते. परंतु या प्रक्रियेवर त्या त्या व्यक्तीचं शारीरिक स्वास्थ्य, मनस्वास्थ्य, वय इत्यादीचा प्रभाव असतो. वयानुसार पुरुषांमध्ये कार्यरत असलेल्या टेस्टेरॉन या विशिष्ट सम्प्रेरकाचे प्रमाण ही कमी होत जाते ज्यामुळे लैंगिक उत्तेजनही कमी होत जाते आणि हे नैसर्गिक किंवा स्वाभाविक आहे. शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य असेल, ताणताणाव असतील तर अशा स्थितीतही शरीर संबंधांप्रति अनिछा, अल्पकालीन ताठरता, वीर्य लवकर बाहेर येणे अशा स्थितीचा सामना करावा लागतो. लिंग शिथिलतेचा प्रश्न हा अनेक पुरुषांना भेडसावत असतो. जर यामुळे लैंगिक सुख अनुभवण्यास त्रास होत असेल तर त्याला आपण समस्या म्हणू शकतो यामुळे दोन्ही जोडीदारांची निराशा होऊ शकते. सेक्सविषयी भीती किंवा अति आतुरता, कामाचा किंवा इतर प्रकारचा ताण, लैंगिक संबंधाचा आधीचा अनुभव फारसा आनंददायी नसेल तर त्यामुळेही असा त्रास होऊ शकतो होऊ शकतो. काही वेळा काही शारीरिक आजारही कारणीभूत ठरतात. यासाठी सेक्सची सवय झाली की हळू हळू यावर ताबा येतो. रिलॅक्सेशन पद्धतींचा उपयोग होऊ शकतो. सेक्स आणि संभोगाबद्दलची चिंता, दडपण दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा उपयोग होईल. तसंच ऑरगॅझम कधी येतो, त्याआधी शरीरात, मनात काय संवेदना निर्माण होतात याचं निरीक्षण करा. त्या क्षणी समागमाचा वेग थोडा मंदावण्याचा प्रयत्न केला तर लवकर वीर्य बाहेर येणार नाही. यासाठी जोडीदाराचं सहकार्य आवश्यक आहे आणि मुख्य म्हणजे एकमेकांशी संवादही तितकाच महत्त्वाचा आहे.वैद्यकीय मदत, सेक्सॉलॉजिस्टचा सल्ला आणि काही वेळा औषधांचा उपयोग होऊ शकतो. न घाबरता आणि न लाजता आपली समस्या डॉक्टरांना सांगा. दोन्ही जोडीदारांनी दोषारोप न करता एकमेकांना समजून घेतलं, सेक्स सोडून एरवीही जवळीक वाढवली, धीर दिला तर त्याचा परिणाम निश्चित चांगला होऊ शकेल.

३. तिसरा प्रश्न आहे, उत्तेजना मिळाली तरीही लगेच शीघ्रपतन होते. शीघ्रपतन होण्यामागे अनेक घटक कारणीभूत असतात, त्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा. https://letstalksexuality.com/premature-ejaculation आणि https://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/

नमस्ते सर, माझ्या लग्नाला सतरा वर्षे पूर्ण झाली आहेत तरी मला कधीच सेक्स ला त्रास झाला नाही परंतु आता मात्र माझ्या लिंगावरील स्किन फाटते आहे किंवा मागे जाण्यासाठी त्रास होतो आहे मला अॉपरएशन टाळायला हवे आहे तरी कृपया आपण मला मार्गदर्शन कराल का 🙏

आपले उत्तर प्रविष्ट करा

12 + 6 =