प्रश्नोत्तरेसंभोग करताना योनींमध्ये बोट घातल्यावर साबण न लावता हात धुवून जेवन केले तर काय होईल

1 उत्तर

योनीमध्ये तोंडावाटे पसरणाऱ्या आजारांचा जंतुसंसर्ग नसेल तर काहीच होणार नाही. योनीमध्ये कोणताही जंतुसंसर्ग नसेल तर योनिमार्गातील स्राव तोंडात जरी गेले तरी त्यापासून काहीही धोका नाही. मात्र जेवणाआधी हात धुणे ही आरोग्यासाठी पूरक अशी सवय आहे त्यामुळे “काहीच केले नाही” तरीही जेवणाआधी साबण आणि पाण्याने हात धुतले पाहिजेत. दुसरी एक महत्वाची गोष्ट शरीर संबंधाच्या वेळी स्वच्छता राखणं महत्वाचं असतं. मग ते संभोगाआधी असू दे किंवा संभोगानंतर. तुमच्या कोणत्याही कृतीमुळे जंतूंचा संसर्ग होणार नाही याची दक्षता घेतली जाणं महत्वाचं आहे. बोटाची नखे कापलेली नसतील आणि त्यात घाण साठलेली असेल तर त्यामुळे देखील जंतुसंसर्ग होऊ शकतो. स्त्रीच्या योनिमध्येही योनीचे संतुलन राखण्यासाठी जीवाणू-विषाणूची निर्मिती होत असते. यामुळे हात स्वच्छ नसतील तर विविध जीवाणू, किटाणू योनीमार्गात जाऊन इन्फेक्शन होऊ शकते. त्यामुळे संभोगाआधी आणि संभोगानंतर स्वच्छता राखणे ही दोन्ही जोडीदारांची जबाबदारी आहे.
 

आपले उत्तर प्रविष्ट करा

11 + 5 =