सबंध asked 4 years ago

माझ्या बायकोची एका मुलाबरोबर तीन वर्षापासून मैत्री होती, ती दोघे आपले सर्व खाजगी गौष्टी एकमेकांना सांगत, पण ह्या गोष्टी मला पटत नसलेने मी बरेच वेळा सांगातले पण त्यावेळी त्यानी राखी बांधली, मी माझ्याकडून खूप समजावले पण त्यावेळी माझ्या बायकोकडून आमचे फक्त मैजीचे व बहिण भावाचेच नाते आहे असे सागातले. मागील काहि महिन्यांपासून माझी लिंगाची कार्य क्षमता कमी झाली आहे. माझे सध्याचे वय 40 आहे व बायकोचे वय 36 आहे. काहि दिवसांपूर्वी त्या बायकोच्या मिजास आपण शारिरीक संबंध ठेवुया का असे माझ्या बायकोला विचारले आणि बायकोने होय म्हटले आहे, आता बायकोने माझी परवानगी मागितली आहे, माझे माझ्या बायकोवर खुप प्रेन आहे, मी काय करावे

1 उत्तर
Answer for सबंध answered 4 years ago

तेच करा जे तुम्हाला तुमचे मन सांगते आहे. जे तुम्हाला योग्य वाटते आहे. तुम्ही म्हणता आहात तुमच्या पत्नीने त्या व्यक्तीला होकार कळवला आहे आणि मग तुमची परवानगी विचारली आहे. त्यांनी निर्णय घेतला आहे असं तुमच्या सांगण्यावरून दिसतं आहे. तुम्हाला कल्पना असावी म्हणून तुमच्या पत्नीने हे तुम्हाला विचारण्याचे पाऊल उचलले आहे का? कारण त्यांनी तुम्हाला कल्पना देणं हे ही खूप धीराचे काम आहे. लैंगिक नातेसंबंध ही खूप नाजूक, जबाबदारीने ठरवण्याची आणि जोखमीचीही गोष्ट आहे आपल्या समाजात. पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठीही. आपण विशिष्ट ‘निवड’ करत असतो. त्याची किंमतही अदा करावी लागते. सगळंच साधेल अशी स्थिती नसते. नाती दुरावण्याची, तुटण्याची आणि कदाचित जीवनाची सर्व घडी विस्कळीत होण्याची शक्यता असते. बहुतेक वेळेस ही घडी मोडू नये, मानसिक, आर्थिक असुरक्षितता निर्माण होऊ नये म्हणून असे संबंध कोणासमोरही उघड केले जात नाहीत. तुमच्या पत्नीला तुमच्याबद्दल विश्वास वाटत असावा कदाचित म्हणून त्यांनी तुम्हाला सांगितले असेल. अर्थात हे तुम्हीच अधिक चांगल्या प्रकारे ओळखू शकता. आमचा सल्ला एवढाच असेल की तुमचे मन काय सांगते आहे ते ऐका आणि तसे त्यांना सांगा. आणि जे घडेल त्याची किंमत देण्याची तयारी ठेवा. यातून तुमचे नाते घडेल किंवा बिघडेल. पण कुठल्याही नात्याने कुणाचीही कुचंबना होत असेल तर ते योग्य नाही. तुमच्या पत्नीच्या या नात्यामुळे तुमची कुचंबना होणार असेल तर तसे त्यांना सांगा. तुमच्या अशा म्हणण्यामुळे त्यांची कुचंबना होणार असेल तर मग तुम्ही दोघांनी तुमच्या सहजीवनाबद्दल अधिक खोलात जाऊन विचार करा. आपल्या आयुष्याचा निर्णय घेण्याचे, स्वतःचा आनंद शोधण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला जसे आहे तसे तुमच्या पत्नीलाही आहे हे लक्षात ठेवा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

9 + 9 =