ज्या व्यक्तीला एच. आय. व्ही./ एड्स आहे अशा एकाजरी व्यक्तीसोबत असुरक्षित लैंगिक संबध आला तर एच. आय. व्ही होऊ शकतो. समोरच्या व्यक्तीला एच. आय. व्ही./ एड्स आहे की नाही हे ओळखण्याचा एच. आय. व्ही. टेस्ट व्यतिरिक्त इतर कोणताही मार्ग नाही. म्हणूनच जास्त व्यक्तींशी असुरक्षित लैंगिक संबध ठेवले तर लैंगिक संबंधातून पसरणारे आजार पसरण्याची शक्यता असते.
(एचआयव्हीची लागण होण्याचे बिगर लैंगिक मार्ग म्हणजे
निर्जंतुक न केलेल्या इंजेकशनच्या सुया,
दूषित रक्त आणि
प्रसूतीच्या वेळी आईकडून बाळाला एचआयव्हीची लागण होऊ शकते.)
एच. आय. व्ही./ एड्स विषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.
https://letstalksexuality.com/hiv_aids/
आपल्या वेबसाईटवर एच. आय. व्ही./ एड्स विषयीचे अनेक प्रश्न चर्चिले आहेत ती ‘प्रश्नोत्तरे’ जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.
प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/