लहान आसताना माझा फक्त दोन मुलांशि लैंगिक संबध झाला होता फक्त एकदाच तर मला एडस होऊ शकतो का याला दहा वर्ष झाले पण मी कधी समलिंगी बदल वाचतो तर मला शंका येते तर मला या बदल माहीती द्या मो.
तुमचा जेव्हा शेवटी संबंध आला होता त्यानंतर तुम्ही एच.आय.व्ही. ची टेस्ट केली होती का? संबंध आल्यानंतर तीन महिन्यांच्या अवकाशाने केली गेलेली टेस्ट जर निगेटिव असेल तर काळजीचं काही कारण नाही. तुम्हाला एड्स होणार नाही.
आता पुढील काही महत्वाचे मुद्दे जे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे.
त्यावेळी तुम्ही स्वतः किती वयाचे होतात? आणि ती मुलं किती वयाची होती? तुमचा लैंगिक संबंध आला होता म्हणजे काय? गुदद्वारावाटे संभोग झाला होता का? जर तुमचं वय १८ पेक्षा अधिक आणि त्यांचं वय १८ पेक्षा कमी असेल तर हे चुकीचं आणि गंभीर आहे कारण ते अशा संबंधांसाठी संमती देण्यासाठी सक्षम नाहीत. अशा गोष्टी निव्वळ कुतुहलापोटीही होऊ शकतात पण तरीही ते मुळात चुकीचं आहे. विशेषतः तेव्हा जेव्हा तुम्ही प्रौढ असता आणि ते सज्ञान नसतात. जरी तुम्ही सर्वच १८ पेक्षा अधिक वयाचे होता तरी त्यात त्यांची संमती घेतली होती का? जोडीदाराच्या संमतीविना केलेली कुठलीही गोष्ट चुकीचीच आहे.
खरंतर विना संमती कुठलीही लैंगिक कृती चुकीची आहे.