पॉर्न बघायचा की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पॉर्नमध्ये दाखविलेल्या सगळ्याच गोष्टी खऱ्या नसतात हेही आपण समजून घेतले पाहिजे. अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.
https://letstalksexuality.com/fiction-reality/
https://letstalksexuality.com/pornography-feminist-critique/
आता बोलूयात हस्तमैथुनाबद्दल. स्वतःच्या शरीराला स्पर्श करून लैंगिक सुख मिळवण्याच्या क्रियांना हस्तमैथुन म्हणतात. हस्तमैथुनामध्ये लैंगिक अवयवांना स्पर्श करणे, कुरवाळणे किंवा घासणे या क्रियांचा समावेश होतो. या स्वाभाविक क्रिया आहेत. मुलं-मुली, स्त्री-पुरुषही हस्तमैथुन करतात. जोपर्यंत स्वतःला दुखापत होत नाही किंवा रोजच्या कामात अडथळा येत नाही तोपर्यंत हस्तमैथुनात काही धोका नाही. मात्र हस्तमैथुन करताना कोणत्या धातूच्या, काचेच्या टोकदार वस्तू वापरल्या तर मात्र लिंगाला इजा होऊ शकते. ती खबरदारी घेणं गरजेचं आहे. आपल्या वेबसाईटवर हस्तमैथुनासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया ‘FAQ – शंका समाधान’ तसेच प्रश्नोत्तरे जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.
‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/
प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/