प्रश्नोत्तरेCategory: Private Questionसर मी हस्तमैथुन 14 वषॉचा होतो तेव्हापासून करतो आठवड्यातून 4/5 वेळेस पण आता अपराधी असल्यासारख वाटत आणि शारिरीक कमतरता वाटते का?

1 उत्तर

मित्रा, तुला कोणतीही वाईट सवय नाही त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा स्वतःची लाज वाटून घेणं, अपराधी वाटून घेणं बंद कर. काही तथ्य आणि शास्त्रीय माहिती जाणून घेतली म्हणजे तुझ्या मनातील अपराधीपणाची भावना आपोआपच कमी होईल.

लैंगिक इच्छा होणं आणि हस्तमैथुन करणं अगदी नैसर्गिक आहे त्यात काहीही गैर नाही. हस्तमैथुन ही एक नैसर्गिक क्रिया आहे व स्वतःला लैंगिक आनंद देण्यासाठी ही क्रिया सर्वात सुरक्षित क्रिया आहे. शिवाय हस्तमैथुनातून आपल्याला आपल्या शरीरातील कोणते भाग लैंगिक दृष्ट्या सर्वात जास्त संवेदनशील आहेत हे कळण्यासाठी देखील मदत होते. हस्तमैथुन केल्याने काहीही दुष्परिणाम होत नाहीत. हस्तमैथुन केल्याने लिंगामध्ये ताठरता येण्यास काहीही अडचण येत नाही. आपल्या वेबसाईटवर हस्तमैथुनासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया ‘लेख’, ‘FAQ – शंका समाधान’ तसेच ‘प्रश्नोत्तरे’ जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.

लेख- https://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/

‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 7 =