प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsसर, मी २५ वर्षीय आहे आणि माझी प्रेयसी पण २२ वर्षीय आहे ..आम्ही एकमेकांवर पूर्ण विश्वास करतो व एकमेकांचा तितकाच आदर पण करतो ..पण आम्हाला योग्य पद्धतीने शरीर संबंध ठेवणे योग्य आहे का? व ते कशा पद्धतीने ठेवले जायला हवे? कोणती काळजी घ्यायला हवी? कृपया मार्गदर्शन करा.

सर, मी २५ वर्षीय आहे आणि माझी प्रियासी पण २२ वर्षीय आहे ..आम्ही एकमेकांवर पूर्ण विश्वास करतो व एकमेकांचा तितकाच आदर पण करतो ..पण आम्हाला योग्य पद्धतीने शरीर संबंध ठेवणे योग्य आहे का? व ते कशा पद्धतीने ठेवले जायला हवे कोणती काळजी घ्यायला हवी? कृपया मार्गदर्शन करा.योग्य मार्गदर्शन मिळेल अशी अपेक्षा..

1 उत्तर

तुमच्या प्रश्नातले सर्वात महत्त्वाचे दोन शब्द म्हणजे विश्वास आणि आदर. तुमचा एकमेकांवर पूर्ण विश्वास असेल, एकमेकांबद्दल तुम्हाला आदर असेल आणि तुम्हाला दोघांनाही शरीरसंबंध ठेवण्याची इच्छा असेल तर आपको किसने रोक के रखा है भैय्या?
शरीर संबंध ठेवण्याची एक अशी योग्य पद्धत नाही. एकमेकांना चांगलं, सुरक्षित, सुखकारक वाटेल ती पद्धत म्हणजे तुमच्यासाठी योग्य पद्धत. एकमेकांना जवळ घेणे, चुंबन घेणं, शरीराला, शरीराच्या अवयवांना स्पर्श करणं, कुरवाळणं अशा अनेक कृतींमधून एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करता येतं. प्रणयामुळे किंवा एकमेकांना छान वाचेल अशा स्पर्शांमुळे एकमेकांवरचं प्रेम वाढतं, सुरक्षित असल्याची भावनाही तयार होते. शरीर संबंध म्हणजे केवळ संभोग नाही. आणि संभोग करायचा असेल, म्हणजेच लिंग योनीमध्ये जाईल अशा रितीने सेक्स करायचं असेल तर त्यासाठी दोघांचीही तयारी हवी. सेक्ससाठी तुम्ही तयार आहात का हा लेख नक्की वाचा.
तुमची दोघांची तयारी असेल तर अशी एखादी  जागा निवडा जिथे तुम्हाला दोघांनाही सुरक्षित वाटेल. एकमेकांच्या किती जवळ यायचं याबद्दल एकमेकांशी बोला. कोणत्याही क्षणी थांबता येईल असा विश्वास दोघांनाही वाटायला हवा. लैंगिक उत्तेजना निर्माण होण्यासाठी एकमेकांशी बोला, स्पर्श, चुंबन, कुरवाळण्याने स्त्रीच्या योनीमार्गामध्ये ओलसरपणा निर्माण होतो. पुरुषाचं लिंग आतमध्ये जायला मदत होते. पुरुषामध्ये लैंगिक उत्तेजना निर्माण झाली की लिंग हळू हळू ताठर व्हायला लागतं. लिंग ताठर झाल्यावर दोघांच्या संमतीने लिंग स्त्रीच्या योनीमध्ये सरकवता येतं. लैंगिक उत्तेजना शिगेला पोचली की पुरुषाच्या लिंगातून वीर्य बाहेर पडतं आणि त्यानंतर लिंग शिथिल होतं व योनीतून बाहेर येतं. स्त्रियांमध्ये योनीमध्ये क्लिटोरिस नावाचा अवयव असतो. त्याचं टोक लघवीच्या जागेच्या वर असतं. त्याला स्पर्श केल्याने स्त्रियांनाही लैंगिक सुखाचा अनुभव मिळतो. याविषयी सेक्स बोलें तो या विभागमध्ये अधिक माहिती नक्की वाचा. 
काही गोष्टींचा विचार जरूर करा

  • सेक्स किंवा शरीर संबंध वाईट किंवा घाण नाहीत. एकमेकांची संमती, आदर आणि विश्वास असेल तर शरीरसंबंध ठेवण्यात गैर काहीच नाही.
  • केवळ संभोग म्हणजे शरीर संबंध नाही. अनेक प्रकारे एकमेकांना शरीर सुख देता येतं.
  • संभोगामुळे दिवस जाऊ शकतात.  त्यामुळे तुम्हाला मूल नको असेल तर निरोध किंवा इतर गर्भनिरोधक पद्धतींचा वापर करा. अधिक माहितीसाठी नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी हा लेख नक्की वाचा.

प्रेमामधली पुढची पायरी एकत्र चढून जात आहात. त्यासाठी ऑल द बेस्ट!!!

आपले उत्तर प्रविष्ट करा

2 + 17 =