एखाद्या व्यक्तिविषयी लैंगिक भावना किंवा आकर्षण निर्माण होणे ही अगदी नैसर्गिक गोष्ट आहे. इतर भावनांसारख्याच लैंगिक भावनाही नैसर्गिक आहेत. मनात निर्माण होणाऱ्या सगळ्याच भावना प्रत्यक्षात कृतीत उतरतील असे मात्र नेहमी होणे शक्य नाही. प्रत्यक्ष संबंध ठेवण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीची इच्छा आणि संमती आवश्यक असते. जोडीदाराविषयी आदर असणं देखील महत्वाचं आहे. लैंगिक इच्छा होणं नैसर्गिक असलं तरीदेखील मुलींकडे फक्त लैंगिक संबंध ठेवण्याच्या दृष्टीनेच बघणं हे मात्र चांगले नाही. प्रत्यक्ष लैंगिक संबंध ठेवणे शक्य नसेल अशावेळी काहीजण हस्तमैथुन करतात आणि त्यात गैर काहीही नाही.
आणखी एक गोष्ट कंड झवने यांसारखे शब्द शिव्यांमध्ये आणि वापरले जातात त्यात एक प्रकारची नकारात्मकता आणि काही वेळा स्त्रीविषयीचा अनादर दिसून येतो. याला लैंगिक इच्छा आणि लैंगिक संबंध/सेक्स असे शब्द उपलब्ध आहेत. काहीजणांना पर्यायी शब्द माहित नसतात हे आम्ही समजू शकतो. पण स्त्रीचा अनादर करण्यासाठी मुद्दामहून असे शब्द वापरत असेल तर ती एकप्रकारची हिंसाच आहे.