प्रश्नोत्तरेसुहागरात कशी असते

1 उत्तर

सुहाग रात, लग्नाची पहिली रात्र – नक्की काय होणार, काय करायचं, कसं करायचं अशी धडधड, त्याचं टेन्शन असण्याची शक्यता असते. गोष्टी, कथा कांदबऱ्या आणि सिनेमाने मनात कोरून ठेवलेले पहिल्या रात्रीचे प्रसंग पाहिलेले वाचलेले असतात. आयुष्यातील पहिला वहिला सेक्स करताना सर्वप्रथम दोन्ही जोडीदारांची तयारी आहे ना हे पहायला पाहिजे. पहिला रात्री सेक्स केलाच पाहिजे याचंही दडपण घेण्याची गरज नाही.सेक्स करण्याची इच्छा आहे ना, संमती आहे ना आणि दोघांनाही तेवढीच ओढ आहे ना याचा विचार व्हायला पाहिजे. सेक्स म्हणजे फक्त संभोग किंवा इंटरकोर्स नाही. त्याआधी एकमेकांना सुखावेल अशा पद्धतीने जवळीक साधणं आणि एकमेकांना छान वाटेल अशा पद्धतीने संवाद साधणं आवश्यक आहे. याला प्रणय किंवा फोअरप्ले म्हणतात. संभोगाची घाई सेक्समधील आनंद कमी करू शकते. आणि पहिल्यांदा सेक्स करताना सगळ्या गोष्टी तुम्हाला किंवा तुमच्या जोडीदाराला जमायलाच पाहिजेत असा आग्रह धरू नका. तुम्हाला आनंद मिळणं आणि छान वाटणं जास्त महत्त्वाचं आहे. मुलींच्या योनीमार्गात एक लवचिक पडदा असतो, ज्याला हायमेन असं म्हणतात. पहिल्या सेक्सच्या वेळी हा पडदा विलग होतो आणि कधी कधी त्यातून रक्त येतं. मात्र एक गोष्ट पक्की लक्षात घ्या. हा पडदा  सायकल चालवणं, खेळ, पोहणं, कष्टाची कामं अशा इतरही कारणांनीही फाटू शकतो. त्यामुळे प्रत्येक मुलीच्या योनीमार्गात हा पडदा असतोच असं नाही आणि तो पहिल्या सेक्सच्या वेळी फाटून रक्त येतंच असं नाही. पहिल्यांदाच सेक्स करत असाल तर प्रभावी गर्भनिरोधक वापरणं कधीही चांगलं. निरोध किंवा कंडोमचा वापर करा आणि गर्भधारणा किंवा लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या आजारांची भीती मनातून काढून टाका. लग्नाच्या याच पहिल्या रात्रीचं सुंदर आणि हळुवार चित्रण करणारी कविता खास तुमच्यासाठी – नक्की वाचा ..  https://letstalksexuality.com/the-wedding-night/
 

आपले उत्तर प्रविष्ट करा

1 + 7 =