प्रश्नोत्तरेसेक्स केल्यानंतर विर्य बाहेर येते का ? व त्यामुळे मुल होत नाही का?

2 उत्तर

गर्भधारणेसाठी केवळ एक पुरूषबीज पुरेसे असते. सेक्स केल्यानंतर काही वीर्य स्त्रीच्या योनिबाहेर येऊ शकते पण त्यामुळे मुल होत नाही किंवा गर्भधारणा होत नाही हा गैरसमज आहे. सर्वप्रथम आपण गर्भधारणा कशी होते हे समजून घेवूया. बहुतेक स्त्रियांच्या शरीरात गर्भाशय, बीजवाहिन्या आणि बीजकोष असतात. मुलगी जन्माला येते तेव्हा तिच्या बीजकोषामध्ये अनेक स्त्री बीजं असतात. वयात येण्याच्या काळात बीजकोषातली बीजं परिपक्व किंवा तयार व्हायला सुरुवात होते. आणि त्यानंतर दर पाळीचक्रामध्ये (साधारणपणे २२ ते ३५ दिवसाचे एक चक्र) एक स्त्रीबीज पूर्ण तयार होऊन बीजकोषातून बाहेर येते व बीजवाहिन्यांमध्ये जाते. या प्रक्रियेला अंडोत्सर्जन (Ovulation) म्हणतात. बीजवाहिनीमध्ये हे बीज १२-२४ तास जिवंत असते. त्या काळात पुरुष बीजाशी संपर्क आला तर तिथे त्यांचं मिलन होऊन गर्भधारणा होऊ शकते. पुरुषाच्या शरीरात वृषणांच्या आत दोन बीजकोष असतात. मुलगा वयात येऊ लागला की या बीजकोषांमध्ये प्रचंड मोठ्या संख्येने पुरुष बीजं तयार व्हायला लागतात. यांनाच शुक्राणू असंही म्हणतात. असं म्हणतात की पुरुषाच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला १००० पुरुष बीजं तयार होतात. आणि त्यातलं एकच गर्भधारणेसाठी पुरेसं असतं! लैंगिक संबंधांदरम्याल जेव्हा पुरुषाचं लिंग ताठर झाल्यावर स्त्रीच्या योनीमध्ये प्रवेश करतं तेव्हा एका क्षणी लिंगामधून वीर्य बाहेर येतं. या वीर्यामध्ये लाखोंच्या संख्येने पुरुष बीजं असतात. ती पोहत पोहत बीजवाहिन्यांच्या दिशेने प्रवास करू लागतात. बीजवाहिनीमध्ये तेव्हा स्त्री बीज असेल तर एक पुरुष बीज स्त्रीबीजामध्ये शिरतं आणि त्यातून फलित गर्भ तयार होतो. हा फलित गर्भ पुढील १० दिवसांमध्ये पुढे सरकत येतो आणि गर्भाशयाच्या भिंतीवर रुजतो. ही सर्व प्रक्रिया निर्धोकपणे पार पडली तर गर्भधारणा झाली असं म्हणता येईल. येथे एक लक्षात घेतली पाहिजे की, पुरुषाच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला १००० पुरुष बीजं तयार होतात. संबंधाच्या वेळी पुरुषाच्या लिंगातून जे वीर्य त्यात लाखोंच्या संख्याने पुरुषबीजे तयार होतात आणि त्यातलं एकच गर्भधारणेसाठी पुरेसं असतं! त्यामुळे जरी सेक्स केल्यानंतर काही वीर्य स्त्रीच्या योनिबाहेर पडले तरीही एक पुरूषबीज सहज बीजवाहिनी मध्ये जाऊ शकते व तिथे स्त्री बीजाशी संपर्क येऊन गर्भधारणा होऊ शकते म्हणजेच मुलंही होऊ शकते.

pan.garbh rahnyasathi jast shukranu lagtat

Samir replied 12 months ago

मी सेक्स करतो पण जेव्हा लिंग बाहेर काढतो स्त्री योनीतुन मला वीर्य बाहेर दिसतो

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 13 =