सेक्स asked 8 years ago

14 किवा 15 age च्या मूली सोबत सेक्स करने योग्य आहे का?

1 उत्तर
Answer for सेक्स answered 8 years ago

१४ किंवा १५ वर्षांच्या मुलीसोबत सेक्स करणे हे त्या मुलीचे शोषणच ठरेल. भारतामध्ये कायद्यानुसार १८ वर्षाच्या आतील व्यक्तीसोबत सेक्स करणे हा कायद्याने गुन्हा आहे. संमती देण्याचं किंवा लैंगिक संबंध म्हणजे काय, संमती म्हणजे काय, हे कळण्याचं हे वय नाही असे मानले जाते. त्यामुळे १८ वर्षाच्या आतील व्यक्तीसोबत जर कोणी लैंगिक संबंध ठेवत असेल तर त्यांच्यावर बलात्काराचा आणि बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल होऊ शकतो.  स्वतःच्या लैंगिक सुखासाठी १८ वर्षाच्या आतील  व्यक्तीच्या  लैंगिक अवयवांना हात लावणे,  लैंगिक संबंध ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे. याशिवाय जर कोणी खोटी आश्वासने, लग्नाचे आमिष, भीती, दबाव आणून कोणत्याही स्त्रीसोबत लैंगिक संबंध ठेवत असेल तरीही तो कायद्याने बलात्कार मानला जातो. बाल लैंगिक शोषणाचे मुलांच्या मनावर खूप नकारात्मक आणि दूरगामी परिणाम होतात. तुम्हाला जर कोणी असं करताना आढळले तर ताबडतोब त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदवा.

 

आवाहन

तुमच्या प्रश्नाबद्दल धन्यवाद. प्रश्नाला मिळालेल्या उत्तराने काही प्रमाणात तरी तुमचे शंका निरसन झाले असावे अशी आशा आहे. मानवी लैंगिकतेचे अनेकानेक पैलू समजून घेता यावे आणि लैंगिकतेशी संबंधित कुठल्याही शंकेला अथवा प्रश्नाला व्यक्त करता यावं, प्रश्नांना वैज्ञानिक आणि संवेदनशील उत्तरं मिळावीत याच उद्देशाने ही वेबसाईट आम्ही चालू केली आहे. एका वर्षातच आपल्या या वेबसाईटला २ लाखापेक्षा अधिक ‘हिट्स’ मिळाल्या आहेत. शिवाय आपल्या ‘प्रशउत्तरे’ या मंचावर रोज दोन ते तीन प्रश्न विचारले जातात. प्रश्नकर्त्याविषयीची गोपनीयता हे एक महत्वाचे वैशिष्ट्य आपली वेबसाईट लोकप्रिय असण्या मागचे प्रमुख कारण आहे.

 

तुम्हाला आमचा प्रयत्न उपयोगी वाटतो का? तुम्ही या वेबसाईटबद्दल इतरांना सांगाल का? ही वेबसाईट आणखी चांगली कशी करता येईल? काय नाही आवडलं? या आणि अशा मुद्यांवर तुम्हाला आमच्याशी बोलायला आवडेल का? प्लीज तुम्ही आम्हाला लिहून कळवा किंवा मोबाईलचा वापर करून आपलं मत ऑडिओ किंवा व्हिडीओ रुपात रेकॉर्ड करून आम्हाला पाठवू शकता. तुमची ओळख गोपनीय राखली जाईल ही खात्री बाळगा. आपले बहुमूल्य मत आम्हाला tathapi@gmail.com या ई मेल वर अथवा या 9545555670 व्हाट्स अप क्रमांकावर जरूर पाठवा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

11 + 20 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी