सेक्स asked 8 years ago

एकदा सेक्स केल्यावर योनीं मध्ये काय फरक होतो? आणी सेक्स केलेला चेक कैल्यावर समजते का? ****

1 उत्तर
Answer for सेक्स answered 7 years ago

नाही. हे ओळखण्याचा कोणताही मार्ग नाही. स्त्रीच्या योनीमार्गात हायमेन नावाचा लवचिक पडदा असतो. बऱ्याचदा या पडद्याचा संबंध स्त्रीच्या कौमार्याशी लावला जातो. पहिल्या शरीर संबंधांच्या वेळेस रक्त आले तरच स्त्री कुमारी असे मानले जाते. हा खूप मोठा गैरसमज आहे. स्त्रीच्या लैंगिकतेवर नियंत्रण ठेवण्याच्या पुरुषप्रधान मानसिकतेतून आलेला हा गैरसमज आहे. योनिमार्गातील हा पडदा सायकल चालवणं, खेळ, पोहणं, कष्टाची कामं अशा इतरही कारणांनीही फाटू शकतो. त्यामुळे प्रत्येक मुलीच्या योनीमार्गात हा पडदा असतोच असं नाही आणि तो पहिल्या सेक्सच्या वेळी फाटून रक्त येतंच असं नाही.

कौमार्य किंवा वर्जिनिटी ही फार मजेशीर कल्पना आहे. आपले नाते आणि लैंगिक संबंध हे आपल्या इच्छसाठी, प्रेमासाठी आणि नात्याचा भाग म्हणून केले जातात. त्यामध्ये जोडीदाराच्या (कोमार्य) वर्जिनिटीने काही फरक पडेल असं नाही. आणि जर आधीच्या आयुष्यात लैंगिक संबंध आले का नाही हे माहित करून घ्यायचं असेल, त्याने तुमच्या नात्यावर परिणाम होणार असेल तर बोलणे, संवाद साधणे हा एकमेव मार्ग आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

11 + 3 =