प्रश्नोत्तरेस्त्रियानी ब्रा वापरावेत का?
1 उत्तर

हे पूर्णपणे तुम्हाला काय कम्फर्टेबल वाटतं त्यावर अवलंबून आहे. ब्रा किंवा ब्रेसियर्स       वापरायची किंवा नाही हे सर्वस्वी तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे.  मात्र ब्रा खूप घट्ट नसावी, शक्यतो सुती किंवा होजियरीची असावी. वायरफ्रेम असणाऱ्या ब्रा शक्यतो जास्त काळ घालू नयेत. तुम्हाला स्वतःला काही त्रास जाणवत नसेल, ब्रा पुरेशी सैल असेल तर त्याने काही अपाय होण्याची शक्यता नाही
ब्रेसियर्स चा उपयोग स्तनांना आधार देण्यासाठी होतो. विशेषतः धावताना, खेळताना ब्रेसियर्स घातल्यामुळे त्रास जाणवत नाही. छातीलगत व्यवस्थित बसणाऱ्या पण हालचाल करण्यास व श्वास घेण्यास अडथळा न आणणाऱ्या ब्रेसियर्स वापराव्यात. रात्री झोपताना ब्रेसियर काढून ठेवावी, ज्यामुळे रक्ताभिसारण व श्वासोच्छवास सुलभ होईल.
आवाहन
तुमच्या प्रश्नाबद्दल धन्यवाद. प्रश्नाला मिळालेल्या उत्तराने काही प्रमाणात तरी तुमचे शंका निरसन झाले असावे अशी आशा आहे. मानवी लैंगिकतेचे अनेकानेक पैलू समजून घेता यावे आणि लैंगिकतेशी संबंधित कुठल्याही शंकेला अथवा प्रश्नाला व्यक्त करता यावं, प्रश्नांना वैज्ञानिक आणि संवेदनशील उत्तरं मिळावीत याच उद्देशाने ही वेबसाईट आम्ही चालू केली आहे. एका वर्षातच आपल्या या वेबसाईटला २ लाखापेक्षा अधिक ‘हिट्स’ मिळाल्या आहेत. शिवाय आपल्या ‘प्रशउत्तरे’ या मंचावर रोज दोन ते तीन प्रश्न विचारले जातात. प्रश्नकर्त्याविषयीची गोपनीयता हे एक महत्वाचे वैशिष्ट्य आपली वेबसाईट लोकप्रिय असण्या मागचे प्रमुख कारण आहे.   
तुम्हाला आमचा प्रयत्न उपयोगी वाटतो का? तुम्ही या वेबसाईटबद्दल इतरांना सांगाल का? ही वेबसाईट आणखी चांगली कशी करता येईल? काय नाही आवडलं? या आणि अशा मुद्यांवर तुम्हाला आमच्याशी बोलायला आवडेल का? प्लीज तुम्ही आम्हाला लिहून कळवा किंवा मोबाईलचा वापर करून आपलं मत ऑडिओ किंवा व्हिडीओ रुपात रेकॉर्ड करून आम्हाला पाठवू शकता. तुमची ओळख गोपनीय राखली जाईल ही खात्री बाळगा. आपले बहुमूल्य मत आम्हाला tathapi@gmail.com या ई मेल वर अथवा या 9545555670 व्हाट्स अप क्रमांकावर जरूर पाठवा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

15 + 16 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी