प्रश्नोत्तरेहस्तमैथुनामुळे आलेला थकवा कसा घालवावा?

मी 19 वर्षाचा आहे . वयाच्या 11 व्या वर्षापासून हस्तमैथुन करतोय. त्या वेळेस एक  कुतुहृल व आनंद मिळत होता. दिवसातून बर्याचवेळा हस्तमैथुन करायचो. त्यावेळेस कसलाही त्रास होत नव्हता . इ 10 वी ला अशक्तपणाचा त्रास सुरु झाला . पण तो त्रास फक्त अभ्यास करताना व्हायचा . इतर वेळेस हा त्रास होत नसे . मला नीट अभ्यास करता आला नाही . हा त्रास नक्की कशामुळे होतोय हे समजले  नाही . हस्तमैथुनाचे वेसनच लागले होते .
इ 11वीत ही हस्तमैथुनकरतच होतोच . तेव्हाही अभ्यास करताना अशक्तपणा वाटायचाच . अशक्तपणा हा फक्त अभ्यास करतानाच वाटायचा . इतर वेळेस हा त्रास होत नसायचा .
इ 12 वी ला माझ्या लक्षात आले कि हा त्रास हस्तमैथुनामुळे होतोय . पण मला ते थांबवता आले नाहि .वेसनच लागले  होते . परंतु मी खुप दीवसांनि करायचो .नंतर बंद केले .पण त्यासाठी खुपstrugle करावे  लागले . नंतर मला स्वप्नदोषाचा त्रास सुरु झाला . परिक्षेच्या दोन महिने अगोदर मि रस्तमैथुन खुप कष्टाने बंद केले .परंतु स्वप्नदोषाचा त्रास सुरु झालेला होता. रात्री विर्यस्खलन झाल्यानंतर 8ते 10 दिवस मला अभ्यासाला बसल्यावर अशक्तपणा वाटायचा . त्यानंतर मला बरे वाटायचे .मला हा त्रास होत नसायचा. पण पुन्हा  स्वप्नदोष . पुन्हा 8 ते 10 दिवस  अशक्तपणा . नंतर बरे वाटायचे . हे असच चालु राहिले .शेवटी परीक्षेची वाट लागली . CET  ला कमी मार्क्स .मेडीकलला admission झाले नाही . एक वर्ष gap घेतला. त्या वर्षभर तेच झाल . अभ्यास करताना अशक्तपणा . काम करताना काहिच वाटत नसे . हा अशक्तपणा ही एका विशीष्ट वेळेस यायचा. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वा पर्यत . आणि तोही स्वप्नदोषानंतर 8 ते 10 दिवस या वेळेत अभ्यासकरतानाच इतर वेळेस नाही . त्याहि वर्षी CET ला कमी मार्क्स पडले . Admission झाले नाही .
या वर्षी पुन्हा CET ची exam देणार .याही वर्षी तोच त्रास होत होता.मी काही उपाय करतोय चार महीन्यांपासुन . जिम ला जातोय . जिम ला जाताना एक ग्लास दुध दोन चमचे मध टाकून पितो . जिम ला दिड पावने दोन तास वर्क आउट करतो .आल्यानंतर  एक सृफरचंद , दोन केळी , एक बिट , ओट्स , खारिक खातो. मांसाहार हि करतो. माझे वजन हि चांगले आहे . बाँडी हि चांगली झाली आहे .या रुटीनला चार महिने झाले . पण फरक पडत नाहि .रात्री nightfall होतो. फक्त तो वीस एक दिवासांनी होतो . 6ते 7 दिवस अभ्यास करताना अशक्तपणा . नंतर बर वाटत . पून्हा nightfall पुन्हा ……
माझ्या आयुष्यातील खुप दिवस वाया गेलेत . मि काहीही करु शकलो नाहि . माझ्याकडे फक्त 5 महिने आहेत . आणि या त्रासातुन बाहेर पडुन परीक्षा द्यायची आहे . हा लाष्ट चान्स आहे . मला स्वतः ला सिद्ध करायचय . या वर्षि MBBS ला government कोठ्यातुन admission घ्यायचेच आहे. खुप अभ्यास करायचा आहे . पण हा त्रास पिच्छाच सोडत  नाही . मी करत असलेल्या योजनेतुन फरक पडणार का? की अजुन काही उपाययोजना कराव्या लागणार ? Please help me.

1 उत्तर

सर्वात आधी तुझे अनुभव तू अतिशय मोकळेपणाने आणि न लाजता मांडलेस यासाठी तुझं अभिनंदन! या गोष्टी कुणाशी बोलता न आल्यामुळे तू बरंच सहन केलं आहेस. तुझ्यासारख्या अनकेांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरं मिळतील असं वाटतं. तुला जे होतंय त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करूया.
साधारण 6 वीत असल्यापासून तू हस्तमैथुन करत आहेस पण त्याचा ‘त्रास’ मात्र तुला १०वीच्या वर्षातच जाणवायला लागला. १० वीच्या महत्त्वाच्या वर्षात चांगले मार्क मिळवण्याची, स्वतःला सिद्ध करण्याचं टेन्शनही कदाचित या त्रासामागे असू शकेल का? तेव्हाचा विचार कर आणि आठव की तेव्हा तुझ्या मनात बाकी कसल्या चिंता, काळज्या होत्या का? आपण जे करतोय ते – म्हणजेच हस्तमैथुन – योग्य आहे का, ते चूक आहे का बरोबर, आपण काही तरी विकृत, घाणेरडं तर करत नाहीयोत ना, किंवा कुणाला कळलं तर आपल्याला शिक्षा तर होणार नाही ना, असा घोर तुझ्या मनाला लागला होता का? असं काही तू वाचलं होतंस का किंवा कुणी तुला असं काही सांगितलं होतं का? तुझ्या मनावरचं टेन्शन तू कुणाला बोलून दाखवलंस? किंवा मुद्दाम कुणापासून लपवून ठेवलंस? थोडं आठवायचा प्रयत्न कर.
तू म्हणतोस त्याप्रमाणे फक्त अभ्यास करतानाच अशक्तपणा जाणवायचा. म्हणजे एरवीही अशक्तपणा वाटण्यासारखं शरीराचं कोणतं कारण नव्हतं. तुला हस्तमैथुन करण्याचं व्यसन लागलं. पण यावर आपलं दुमत असू शकतं. असं दिसून आलं आहे की एकाकी आणि दुःखी असणारी मुलं इतरांपेक्षा जास्त हस्तमैथुन करतात. खरं तर सगळीच मुलं-मुली हस्तमैथुन करत असतात. मात्र एका दिवसात एकाहून अधिक वेळा हस्तमैथुन करण्यामागे मनातली चिंता, ताण किंवा नैराश्य कारणीभूत असू शकतं.
हस्तमैथुनामुळे अशक्तपणा येत आहे हा तुझा समज हळू हळू पक्का होताना दिसतो आहे. पण असा ग्रह कशामुळे तयार झाला ती सगळी प्रक्रिया जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्रास अभ्यास करतानाच व्हायचा म्हणजे बाकी शारीरिकदृष्ट्या काही वेगळं कारण नव्हतं ही चांगली गोष्ट आहे. मात्र हस्तमैथुन करताना तू जे स्वप्नरंजन करत असशील ते हेल्दी होतं का? तू काय कल्पना करायचास त्याबद्दल कुणा तज्ज्ञ व्यक्तीशी मोकळेपणानं बोलणं गरजेचं आहे.
हस्तमैथुन करणं थांबवायला बरीच एनर्जी लागते आणि त्यामुळेदेखील मानसिक आणि शारीरिक दमणूक होऊ शकतेच. उलट ठराविक काळानंतर हस्तमैथुन केलं तर त्यामुळे मनावरचं दडपण कमी होतं आणि खरं तर मन आनंदीही होतं हे तुला पटतंय का? थोडा काळ बरं वाटायचं, परत त्रास व्हायचा असं तू म्हटलं आहे. असा विचार करून पहा, जे होत होतं त्याबाबत जर तुझ्या मनात अपराधीपणाची भावना नसती, तर परिस्थिती बदलली असती का ? कशी बदलली असती?
व्यायाम, आहार, जिम या सगळ्या तब्येत सुधारण्याच्या स्व मदत पद्धती आहेत. त्या चांगल्या आहेत. पण हस्तमैथुनामुळे वीर्य जातं आणि त्यातून धातु जातो, शरीरातील सत्त्व निघून जातं म्हणून व्यायाम, आहार सुधारणं ही धारणा मात्र आधुनिक वैद्यकाने निराधार ठरवली आहे. उलट समाजमान्य पद्धतीने लैंगिक संबंध ठेवता येत नसतील तर हस्तमैथुन ही चांगली लैंगिक क्रिया आहे असंच मानलं जातं. एक लक्षात घे. सर्व प्रजातींमध्ये फक्त माणूसच असा प्राणी आहे की जो वयात आल्यानंतर, लैंगिक संबंध ठेवण्यास सक्षम झाल्यानंतरही लगेच लैंगिक संबंध ठेऊ शकत नाही. समाजाच्या आणि संस्कृतीच्या अनेक नियमांचा हा परिणाम आहे.
तुझ्या आयुष्यातले बरेच दिवस वाया गेले आहेत असं तू म्हणतोस, पण तसंच काही नाही. हस्तमैथुन केल्यानंतर ऑरगॅझम येतो आणि स्नायू सैलावतात. खरं तर ही अतिशय आनंददायी, समाधान देणारी कृती आहे. मात्र समाज आणि संस्कृतीतल्या नकारात्मक दृष्टीकोनामुळे, रिवाज आणि धारणांमुळे या कृतीला घाण, वाईट, पाप ही बिरुदं चिकटली आहेत. हे पहा, संवेदना शारीर, किंवा शरीराला जाणवत असतात. त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि त्याबद्दलच्या विचारांची मुळं मात्र संस्कृतीत, समाजाच्या रितीरिवाजांमध्ये सापडतात.
तेव्हा वेगळ्या नजरेने या सगळ्याचा विचार करून पहा. थोड्या फार प्रमाणात हस्तमैथुन करून तू लैंगिक आनंद मिळवलास तरी स्वतःला अपराधी मानू नकोस. असा विचार करून पहा, इतर कुणालाही तू त्रास देत नाहीयेस, इजा करत नाहीयेस. तू कोणतंही पाप करत नाहीयेस. जसं व्यायामानं तुझं शरीर तंदुरुस्त होईल तसंच मनाचे काही व्यायाम केलेस तर निकोप, निरोगी विचार मनात यायला लागतील. एक वेगळा दृष्टीकोन मिळेल आणि तुला ज्या संवेदना होतात त्या अशक्तपणा आहेत का स्नायूंचं सैलावणं आहे ते तू नव्याने पाहू शकशील.
काळजी घे, पण टेन्शन नको.
 
 

आपले उत्तर प्रविष्ट करा

7 + 10 =