प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsहस्तमैथुन केल्यावर साधारणपणे किती वीर्य उत्सर्जीत होणे आवश्यक आहे ?? वाढत्या वययानुसार त्याच्या उत्सर्जनावर कीती व कसा परिणाम होतो?? आवश्यकतेपेक्षा कमी किंवा जास्त उत्सर्जन होत असल्यास काय करावे. कृपया मार्गदर्शन करा.
1 उत्तर

हस्तमैथुन केल्यावर किती वीर्य बाहेर येईल असं सांगणं अवघड आहे. प्रत्येकाची शरीराची रचना वेगळी आहे. आणि त्यानुसार त्यांची वीर्यनिर्मितीचा वेग देखील कमी-जास्त होतो. वयात आल्यानंतर वीर्यनिर्मितीला सुरुवात होते आणि मरेपर्यंत ही प्रक्रिया चालू राहते. वीर्यनिर्मिती होण्यासाठी विशिष्ट तापमानाची आवश्यकता असते. त्यामुळे वेगवेगळ्या तापमानात आणि प्रदेशात राहणार्‍या पुरुषांची वीर्याची तुलना होवू शकत नाही. वाढत्या वयानुसार शुक्राणूंची निर्मिती कमी होते परंतू बंद होत नाही. दोन दिवसातून एकदा हस्तमैथुन केल्यावर जेवढं वीर्य बाहेर येईल तेवढच वीर्य दिवसातून दोन वेळा हस्तमैथुन केल्यानंतर नक्कीच येणार नाही. हस्तमौथुन करताना वीर्य कमी येतं की जास्त यापेक्षा त्यामुळं मिळणार्‍या आनंदावर लक्ष केंद्रित केलं तर जास्त आनंद मिळेल असं आम्हाला वाटतं.

आपले उत्तर प्रविष्ट करा

2 + 15 =