आधी रक्त येण्यामागचे कारण पाहूयात … मुलींच्या योनिमार्गात एक पडदा (Hymen) असतो. तो पातळ किंवा जाड असू शकतो. हा पडदा जर फाटला तर रक्त येऊ शकते. पण कधी कधी खेळताना, सायकल चालवताना, पाळीमध्ये टॅम्पोनचा वापर केला तर अशा विविध कारणांनी हा पडदा फाटू शकतो. त्यासाठी केवळ लैंगिक संबंधच व्हायला पाहिजेत असं नाही. (या पडद्याचा संबंध मुलीच्या कौमार्यासोबत लावला जातो त्यामुळे, अनेक मुलांचा असा समज असतो की लग्नाच्या पहिल्या रात्री संभोगानंतर मुलीच्या योनिमार्गातून रक्त आलं नाही तर ती व्हर्जिन नाही. पण हे खरं नाही).
तर आता जाऊया तुमच्या प्रश्नाकडे… जर हा पडदा फाटला असल्यास (कारणे वर दिलेली आहेत) किंवा लैंगिक उत्तेजनेमुळे योनिमार्ग ओलसर होतो आणि लिंग आत सहजपणे जाते व त्यामुळे रक्तस्राव होत नाही.
तुमच्या मनात जर अजुनही द्वंद्व चाललेलं असेल तर आणखी सविस्तर पणे प्रश्न विचारलात तर आणखी सविस्तर उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करु.
Please login or Register to submit your answer