प्रश्नोत्तरेCategory: Public Questions2 condom eka var ek use kele aani te fate  Vagere nahi. Tar hiv honyachi shakyta kiti aste? 

1 उत्तर

एच. आय. व्ही. होण्याच्या प्रमुख कारणांपैकी एक कारण म्हणजे असुरक्षित शारीरिक संबंध. जर जोडीदार एच.आय.व्ही. बाधित नसेल तर मात्र एच. आय. व्ही होण्याची शक्यता नाही. जर समोरील व्यक्तीला  एच.आय.व्ही. असेल आणि तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवताना काळजी घेतली नाही तर समोरील व्यक्तीला त्याची लागण होण्याची शक्यता वाढते.
जोडीदाराला एच.आय.व्ही. असला तरी, संभोग काळात चांगल्या गुणवत्तेच्या कंडोमचा वापर केल्यास एच. आय. व्ही. होण्याचा धोका खूपच कमी होतो. मात्र जर कंडोम योग्य रीतीने वापरला नाही आणि तो निकृष्ट गुणवत्तेचा असेल तर एच. आय. व्ही. तसेच लैंगिक संबंधांतून पसरणाऱ्या आजारास कारणीभूत असलेले इतर जंतू संसर्ग होऊ शकतात. संभोगक्रिया काळात कंडोम फाटू किंवा निसटू शकतो. म्हणून उत्तम गुणवत्तेच्या कंडोमचा नियमित व योग्य प्रकारे वापरामुळे एच. आय. व्ही. संसर्ग होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.
तुम्ही प्रश्नात म्हणाल्याप्रमाणे जर कंडोम फाटला नसेल तो चांगल्या गुणवत्तेच्या तसेच योग्य प्रकारे वापरला असेल तर एच. आय. व्ही. संसर्ग होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.
खरंतर अनेक जणांमध्ये दोन एकावर एक दोन कंडोम वापरले  म्हणजे अधिक सुरक्षित संभोग असा गैरसमज असतो. एकावर एक दोन कंडोम वापरल्याने त्यामध्ये हवा पकडण्याची तसेच कंडोम निसटण्याची शक्यता वाढते त्यामुळे एकाच चांगल्या गुणवत्तेचा आणि योग्य प्रकारे वापरणे आवश्यक आहे.
आवाहन
तुमच्या प्रश्नाबद्दल धन्यवाद. प्रश्नाला मिळालेल्या उत्तराने काही प्रमाणात तरी तुमचे शंका निरसन झाले असावे अशी आशा आहे. मानवी लैंगिकतेचे अनेकानेक पैलू समजून घेता यावे आणि लैंगिकतेशी संबंधित कुठल्याही शंकेला अथवा प्रश्नाला व्यक्त करता यावं, प्रश्नांना वैज्ञानिक आणि संवेदनशील उत्तरं मिळावीत याच उद्देशाने ही वेबसाईट आम्ही चालू केली आहे. एका वर्षातच आपल्या या वेबसाईटला २ लाखापेक्षा अधिक ‘हिट्स’ मिळाल्या आहेत. शिवाय आपल्या ‘प्रशउत्तरे’ या मंचावर रोज दोन ते तीन प्रश्न विचारले जातात. प्रश्नकर्त्याविषयीची गोपनीयता हे एक महत्वाचे वैशिष्ट्य आपली वेबसाईट लोकप्रिय असण्या मागचे प्रमुख कारण आहे.   
तुम्हाला आमचा प्रयत्न उपयोगी वाटतो का? तुम्ही या वेबसाईटबद्दल इतरांना सांगाल का? ही वेबसाईट आणखी चांगली कशी करता येईल? काय नाही आवडलं? या आणि अशा मुद्यांवर तुम्हाला आमच्याशी बोलायला आवडेल का? प्लीज तुम्ही आम्हाला लिहून कळवा किंवा मोबाईलचा वापर करून आपलं मत ऑडिओ किंवा व्हिडीओ रुपात रेकॉर्ड करून आम्हाला पाठवू शकता. तुमची ओळख गोपनीय राखली जाईल ही खात्री बाळगा. आपले बहुमूल्य मत आम्हाला tathapi@gmail.com या ई मेल वर अथवा या 9545555670 व्हाट्स अप क्रमांकावर जरूर पाठवा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 18 =