असं काहीही नसतं. पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जर हा मुलगा मुलींना अशा प्रकारे पाहत असेल, वर अशा अफवा पसरवत असेल, त्याचा त्रास मुलींना होत असेल तर त्याची तक्रार कॉलेजच्या व्यवस्थापनाकडे, कॉलेजमधील लैंगिक छळ विरोधी सेलकडे अथवा पोलिसांकडे तत्काळ करा. अशी तक्रार निनावीही करता येते.