तंबाखू आणि सिगारेटच्या व्यसनाचा शारीरिक, लैंगिक आणि प्रजनन आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तंबाखू आणि सिगारेटच्या धुरातून अनेक रसायनं शरीरात जातात. उदा. निकोटीन, टार, CO. ‘टार’. ही रसायनं हे व्यसन असणाऱ्या लोकांच्या दातांना पिवळी बनवतो, हाताच्या बोटांना लागल्यावर बोटं देखील पिवळी दिसायला लागतात. खूप सिगारेट ओढणाऱ्या आणि तंबाखू लोकांमध्ये छातीचे विकार आणि फुप्फुसाचे आजार होण्याची शक्यता वाढते.
त्याचबरोबर त्यांच्या लैंगिक, प्रजनन आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतात. पुरुषांच्या पुरुषबीज निर्मितीवर विपरीत परिणाम होतो. रक्तवाहिन्या अरुंद होऊन (अॅथेरोस्कलेरॉसिस) लिंगाला उत्तेजना येण्यास अडचण येते.
व्यसनातून बाहेर पडायचे असल्यास एखाद्या समुपदेशक किंवा व्यसनमुक्ती केंद्राची मदत घ्या. सध्या व्यसन करत नसाल तरीही ही समस्या भेडसावत असेल तर एखाद्या डॉक्टरांची समुपदेशकाची मदत घ्या. काही मदत लागली तर आम्हाला नक्की लिहा. काळजी घ्या.