Garbha rahalyavar sex kartanna kandom cha vaper karava ki karu naye kiva yacha kahi parinam garbavar hoil
गर्भ राहिल्यावर कंडोमचा वापर करून सेक्स केला तर गर्भावर काहीच वाईट परिणाम होत नाही. अगदी निर्धास्तपणे कंडोमचा वापर करू शकता. खरंतर स्त्रीला पुरुषापासून एस. टी. आय. म्हणजेच लैंगिक संबंधांतून पसरणारे आजार होऊ नयेत म्हणून संभोग करताना पुरुषाने आवर्जून निरोध वापरावा.
काही विशिष्ट परिस्थिती आणि विशिष्ट समस्या सोडल्या तर गर्भ राहिल्यावर शरीर संबंधांवर इतर कुठलीही बंधनं आणण्याची गरज नाही. अर्थातच दोन्ही जोडीदारांची इच्छा आणि संमती महत्वाची. याविषयीच्या सविस्तर माहितीसाठी ‘गरोदरपणातील लैंगिक संबंध’ हा खालील लिंकवरील लेख वाचा.