प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsस्त्रियांच्या चार जाती असतात का? पदमीनी, हस्तीनी, कामीनी, चित्तीनी. वेगवेगळ्या जातीनुसार योनी, बांधा, सेक्समधील आवड वेगवेगळी असते, हे खंर आहे का?

1 उत्तर

पंधराव्या-सोळाव्या शतकात लाडखान लोधी या लोधी राजवटीतील दिल्लीच्या अधिपतीच्या दरबारातील कल्याणमल्ल नावाच्या पंडिताने आपल्या अधिपतीच्या मार्गदर्शनार्थ "अनंगरंग" नावाचा ग्रंथ रचला. त्यात पुरुषाने आपल्या पत्नीबरोबर कामक्रीडा कशा रीतीने कराव्या व कामजीवन कसे व्यतीत करावे म्हणजे कामसंबंधामधे नीरसता येणार नाही या संबंधाने मार्गदर्शन केले आहे. त्यामधे स्त्रीपुरुषांचे शरीरयष्टी, गुणधर्म व स्वभाववैशिष्ट्ये यानुसार तसेच विविध प्रांतातील स्त्रियांची वैशिष्ट्ये यांचे वर्णन केले आहे. त्यात सुरुवातीला स्त्रियांचे चार प्रकार दिले आहेत.

प्रत्येक प्रकारची स्त्री, तिचा चेहरा, बांधा, त्वचा , इतर अवयवांची ठेवण ( योनीसकट), चालण्याची शैली, आवडीनिवडी यांचे वर्णन ग्रंथकर्ता तपशिलात जाऊन करतो.

पद्मिनी म्हणजे कमळाचे गुणधर्म असणारी, अंगाने भरलेली, वृत्तीने धार्मिक आणि चांगल्या संभाषणाची आवड असणारी.

चित्रिणी म्हणजे चित्रासारखी सुबक. तिचा बांधा कमनीय आणि तिच्यात कलात्मकतेची आवड असते. मात्र कामेच्छा प्रबळ नसते.

शंखिणी थोराड असते, तिचा स्वभाव चिडखोर आणि तिच्या कामभावनेत कमालीची आंदोलने असतात. तिला कपडेलत्ते जास्त प्रिय असतात.

हस्तिनी हत्तीप्रमाणे जाड अवयव असणारी, मंदगतीने चालणारी, खादाड आणि दीर्घ कामेच्छा असणारी असते.

आजच्या संदर्भात पाहायचे झाले तर पतिपत्नींचा परस्पर संवाद, मोकळेपणा, स्वभावभिन्नता, रूचिभिन्नता आणि मुख्य आपली लैंगिकता निकोपपणे स्वीकारण्याची तयारी या गोष्टी कामसुखामधे महत्त्वाच्या ठरतात. अनंगरंगातला तपशील बाजूला ठेवला तरी त्याने वैवाहिक जीवनात कामसंबंध उत्तरोत्तर नीरस होऊ शकतात आणि ते टाळता येऊ शकतात याकडे लक्ष वेधले हे महत्त्वाचे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 5 =