स्त्री आणि पुरुष यांच्या शरीरातील मूलभूत फरकांपैकी गर्भपिशवीचा एक मुख्य फरक आहे. स्त्रीयांना गर्भाशय असतं आणि पुरुषांना नसतं. गर्भाशयाचा मुख्य उपयोग गर्भधारणा झाल्यावर गर्भाला रुजण्यासाठी आणि त्याची वाढ होण्यासाठी जागा उपलब्ध करुन देणं हा आहे. जर एखाद्या स्त्रीला गर्भाशय नसेल किंवा काही कारणामुळं काढून टाकलं असेल तर अशावेळी गर्भधारणा होणं शक्य नाही. तसचं तिला मासिक पाळीदेखील येणार नाही. तिच्या सोबत संभोग करण्यामध्ये काहीही अडचण येणार नाही. ज्या संभोग केला जातो त्यावेळी उत्तेजित झालेलं लिंग स्त्रीच्या योनीमध्ये जात असतं गर्भाशयात नाही. गर्भाशयातून बीजनलिकेत शुक्राणू प्रवास करत जातात आणि गर्भ राहण्याची शक्यता वाढते. जर गर्भाशयच नसेल तर शुक्राणू पुढे जाण्यास काहीही वाव नाही. त्यामुळं गर्भधारणा होणार नाही.
गर्भपिशवी नसतानाही तितक्याच आनंदाने संभोग होवू शकतो. त्यामध्ये कुठेही समस्या येत नाहीत.