उत्तरासाठी तुमचं वय कळालं असतं तर अधिक चांगलं झालं असतं. मुलग्यांना चेहऱ्यावर मिशा – दाढी किंवा जांघांमध्ये आणि एकूणच अंगावर केस असण्यासाठी एक विशिष्ट संप्रेरक कारणीभूत असतं. त्याचं नाव आहे टेस्टेस्टेरॉन. अर्थात ह्या संप्रेरकाच्या अस्तित्वामुळेच पुरुष स्त्रियांपासून वेगळे दिसतात आणि असतात. ह्या आणि अशा इतर काही संप्रेरकांच्या प्रभावमुळेच मुलांमध्ये वयात येण्याची प्रक्रिया सुरु होते. म्हणजे मुलग्यांच्या बीजकोशात पुरुष बीज आणि वीर्य कोशात वीर्य निर्मितीसोबतच तोंडावर, छातीवर आणि जांघांमध्ये केस येणे, आवाजातील बदल, स्नायूंचा विकास ई सर्व बदल ह्या संप्रेरकांच्या प्रभावातूनच होतात.
तुम्ही जर १५-१६ वर्षे अथवा त्याहून अधिक वयाचे असाल आणि तुम्हाला मिशा अथवा दाढी येत नाही आहे असे दिसत असेल तर कृपया तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं उचित ठरेल. ते तुम्हाला योय मार्गदर्शन करतील. ह्याशिवाय अन्य कुठलाही मार्ग अथवा सल्ला कोणी देत असेल उदा. अमुक तेल वापरा अथवा तमुक फळ खा तर सजग असा इतकेच.
19 वर्ष चालू आहे
19 वर्ष चालू आहे
19 वर्ष चालू आहे
19 वर्ष चालू आहे
19 वर्ष चालू आहे
19 वर्ष चालू आहे
19 वर्ष चालू आहे