Try unwanted things, help me ? asked 8 years ago

मी २५ वर्षाचा unmarried आहे

मला internet वर नकोत्या गोष्टी search करू वाटतात

उदा. Pegging sex, male in chastity device, crossdressing त्यामुळे घरात नकोत्या गोष्टी घालण्याची ईच्छा पण होते sorry पण नेहमीच control करता येत नाही ९-१० वेळा त्या गोष्टी try केल्या आहेत control न झाल्याने.

I am straight guy, but कधी तर भटकतो आणी आस काही तर होऊन बसतं आणी लाज वाटते स्वतहाची

आस झालेल नाही की माझ्या वागण्यात बदल झालाय आणी तो इतरांच्या लक्ष्यात आलाय (everything is normal)

Please help me

I want to get rid of from this.

1 उत्तर

मित्रा, तुझ्या मनातील कन्फ्युजन किंवा द्विधा मनस्थिती आम्ही समजू शकतो. खरंतर नॉर्मल काय आणि अबनॉर्मल काय हे कोण ठरवणार? सर्व प्रकारची लैंगिकता (Sexuality) आणि लैंगिक कल (Sexual Orientation) स्वाभाविक किंवा नैसर्गिक आहेत. भिन्नलिंगी कल (heterosexual orientation) हा नॉर्मल आणि बाकीचे अबनॉर्मल, विकृत हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. आपलं लैंगिक आयुष्य जगत असताना स्वतःच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर आणि एकंदरीतच आयुष्यावर वाईट परिणाम होत नसेल आणि आपण इतर कोणाला हानी पोहचवत नसू तर त्यात काहीही गैर नाही.

वयात आल्यावर किंवा वयात येत असताना आपल्यात लैंगिक इच्छा निर्माण होऊ लागतात. आपल्याला आवडणाऱ्या व्यक्ती किंवा व्यक्तींबद्दल लैंगिक आकर्षण वाटायला लागतं. त्यांच्यावर प्रेम करावं, त्यांच्याबरोबर लैंगिक क्रिया करावी अशी इच्छा निर्माण व्हायला लागते. हे आकर्षण तीन प्रकारचं असू शकतं. भिन्नलिंगी, समलिंगी किंवा उभयलिंगी. तर काही जण अलैंगिक असतात. म्हणजेच काही जणांना कुणाही विषयी लैंगिक आकर्षण वाटत नाही.

लैंगिक कलाबद्दल किंवा निवडीबद्दल समजून घेताना एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. वयात येताना कधी कधी काही भिन्नलिंगी मुला-मुलींना समलिंगी आकर्षण निर्माण होऊ शकतं. कालांतराने दोन तीन वर्षात असं आकर्षण नाहीसं होतं आणि त्यांना परत भिन्नलिंगी व्यक्तींबद्दल आकर्षण वाटू लागतं. त्यामुळे वयात आल्यावर लगेचच आपला लैंगिक कल स्पष्ट होतो असं नाही. मात्र सर्वसाधारणपणे 18 वर्षाचे होईपर्यंत आपल्याला आपला कल काय आहे आणि आपल्या मनात कोणाविषयी, कोणत्या लिंगाच्या व्यक्तीविषयी आकर्षण निर्माण होतं हे स्पष्ट होतं.

तुझ्या प्रश्नावरून असं वाटतंय की, तुझ्या मनात तुझ्या लैंगिकतेबद्दल आणि लैंगिक कलाबद्दल कन्फ्युजन असावं. त्याची उत्तरं शोधण्यासाठी तू इंटरनेटवर तू प्रश्नामध्ये लिहिलेल्या गोष्टी शोधात असावास. मात्र

इंटरनेटवर प्रत्येक वेळी योग्य ती किंवा शास्त्रीय माहिती मिळेल याची खात्री देता येत नाही. म्हणूनच तू योग्य समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञ यांची मदत घेऊ शकतोस. तसेच समपथिक ट्रस्ट, पुणे 020 6417 9112’ येथे अवश्य संपर्क कर. एकदा का तुला याबद्दल स्पष्टता आली की स्वतःला जसा आहेस तसे स्वीकार. लैंगिक कल, आवड, इच्छां यामध्ये विविधता असू शकते आणि त्यात काहीही गैर नाही.

या उत्तरामध्ये नमूद केलेल्या काही संकल्पना तुला कदाचित नवीन असतील म्हणूनच अधिक माहितीसाठी दोन लेखांच्या लिंक देत आहे. तसेच वेबसाईटवरील ‘सगळं नॉर्मल आहे’ हा सेक्शनदेखील अवश्य वाच.

तुझ्या लैंगिकता आणि लैंगिक कलाबद्दल स्पष्टता आली की आम्हाला नक्की कळव. तुझ्या मनातील कन्फ्युजन लवकरात लवकर दूर होण्यासाठी तुला खूप खूप सदिच्छा.

https://letstalksexuality.com/sexual-orientation-cannot-be-changed/

https://letstalksexuality.com/sexual-orientation-and-diversity/

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 13 =