प्रश्नोत्तरेMla kalt nahi ki kay nirny ghyva. Tyane fsvlyach dukh ajunhi ahe ani he sagl visrta yet nahiye

Mi ek 25 vrshanchi mulgi ahe. Maze ani eka mulche premsnbndh hotel 2 vrshe. Amhi lgn krnar hoto. Pn jevha to tyar hota tevha mla vel hva hota. Jevha mazi tyari zali tevha tyane nirny ghetla nahi. Ani achank dusrya eka mulishi lgn kele. Mla khup dhkka bsla hota. Ti ek divorcee ahe. To mhnto ki ti suicide krt hoti ani tichyashii Kon lgn krel as tila vat at hot. Mhanun lgn kela. Tyala ek mulgi ahe. Pn ata tyala khub trass hot oy. Tyahi tyanchya sobt attachment hot nahiye. Mla ya ghtnecha ajunhi tras hoto. Doghanahi trastun jav lagty tr to mhntoy ki ashi tyachi wife independent ahe.  Divorce gheun lgn kruya ka. Mla kalt nahi ki kay nirny ghyva. Tyane fsvlyach dukh ajunhi ahe ani he sagl visrta yet nahiye. Ashi chuk kuni ks kay kru shkt ashi vatat.

1 उत्तर
Answer for Krupyalvkr uttr dya.. answered 8 years ago

सर्वप्रथम तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यसाठी उशीर झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आता वळूया तुमच्या  उत्तराकडे. काही निर्णय घेताना मनात बरीच धाकधूक असते. काही निर्णय आयुष्यात महत्वाची भुमिका बजावत असतात. काही निर्णय यशस्वी होतात तर काही मागे पडतात. तुम्ही ज्या निर्णय प्रक्रियेतून आणि नात्याच्या गुंतागुंतीतून जात आहात अशा परिस्थितीमध्ये निर्णय घेणे खरंच अवघड जाऊ शकतं. अशा प्रसंगामध्ये येणाऱ्या ताण- तणावामुळे थोडे गोंधळल्यासारखे होणे, गडबडून जाणे अगदी स्वाभाविक आहे. अशावेळी खरतरं थोडा जास्त वेळ घेतला तरी चालेल पण तुम्ही विचारपूर्वक योग्य तो निर्णय घ्यावा असे वाटते.  
तुम्ही एक व्यक्ती म्हणून कसे आहात,  तुम्हाला स्वतःचे आयुष्य कसे जगायचे आहे आणि तुमच्यासाठी काय योग्य आहे हे खरंतर तुम्हाला अधिक माहित आहे म्हणूनच या परिस्थितीमध्ये तुम्ही काय करावे हे तुम्ही स्वतःच खूप अधिक चांगल्याप्रकारे ठरवू शकता.  मात्र निर्णय घेताना तुम्ही खालील काही गोष्टींचा शांतपणे विचार करावा असे वाटते.  

  • तुम्ही ज्या परिस्थितीमधून जात आहात यात अनेक नाती गुंतली आहेत. तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता त्याला बायको आणि मुलगी आहे. याचा अर्थ त्याच्यावर बायकोची आणि मुलीची जबाबदारी आहे. त्याची बायको स्वतंत्र आहे असे त्याला वाटते आणि त्याला घटस्फोट घ्यायचा आहे, असे त्याला वाटते. त्याची बायको यासाठी तयार आहे का ? तुम्ही सांगितल्यानुसार असे वाटते की त्याचे स्वतंत्र आयुष्य सुरु आहे. तुम्ही स्वतःचा विचार करून त्या दोघांच्या आयुष्याकडे स्वतंत्रपणे आणि तटस्थपणे बघावे असे वाटते.
  • तुम्ही ज्याच्याविषयी बोलत आहात तो व्यक्ती तुमच्याशी किंवा त्याच्या बायकोशी खोटं बोलून फसवणूक तर करत नाही ना? याचाही विचार करावा.
  • तुमच्या जोडीदाराने फसवल्याची भावना आजही तुमच्या मनामध्ये आहे. भूतकाळाचा अनुभव तुमच्या पाठीशी आहे, तो लक्षात घेता इथून पुढे तो तुम्हाला फसवणार नाही याची तुम्हाला खात्री आहे का?  तुम्ही त्या व्यक्तीला माफ करून, त्याच्यावर विश्वास ठेऊन, सगळे विसरून नव्याने त्याच्यासोबत आयुष्य सुरु करायला मानसिकदृष्ट्या तयार आहात का? तुम्ही भावनेच्या भरात तर निर्णय घेत नाही ना?
  • या सगळ्यामध्ये तुमच्या आणि त्या मुलाच्या कुटुंबाचा पाठींबा आहे का ? जर नसेल तर तुम्ही  स्वतंत्रपणे आयुष्य सुरु करण्यास आर्थिकदृष्ट्या सक्षम आहात का आणि तुमची तशी मानसिक तयारी आहे का?
  • तुम्ही कधीतरी कोणावर प्रेम करत होता आणि तो आत्ता त्याच्या वैवाहिक आयुष्यात सुखी नाही म्हणून सहानुभूतीने आणि भावनेच्या भरात निर्णय घेऊ नये असे तुम्हाला सुचवावे वाटते. जर तुम्ही याच व्यक्तीशी लग्नाचा निर्णय घेत असाल तर तुम्हाला काय वाटते, तुमची काय इच्छा आहे, तुमचे पुढचे आयुष्य जगताना या व्यक्तीची ‘प्रामाणिक साथ’ मिळेल का याचा जास्त स्वतंत्रपणे स्वतःच्या भविष्याचा (स्वार्थीपणे म्हंटले तरी चालेल) विचार करावा असे वाटते.
  • तुम्ही जर या व्यक्तीशी लग्न न करण्याचा निर्णय घेतला तर आयुष्याकडे सकारात्मकतेनं बघून नवीन आयुष्य सुरु करा. नवीन जोडीदार शोधा. नवीन नातं सुरु करा. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते त्यामुळे आधीच्या जोडीदाराशी नवीन जोडीदाराशी तुलना करू नका. आयुष्याच्या प्रवासात अनेक व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात. काही आयुष्यभर सोबत राहतात तर काहीजण खूप कमी काळासाठी. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात नसेल तर आपलं आयुष्य थांबत नाही.

या सगळ्याचा विचार करून निर्णय घ्यावा असे सुचवावेसे वाटते. घाईने निर्णय घेण्यापेक्षा योग्य तो वेळ घ्या. विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयावर ठाम रहा.  जर तुम्हाला  निर्णय घेण्यास अजूनही कठीण जात असेल तर एखाद्या समुपदेशकाची मदत घ्या. तुम्हाला आवश्यकता वाटल्यास दोघेही समुपदेशकाकडे जा. आशा आहे की तुम्ही तुमच्यासाठी योग्य तो निर्णय नक्की घ्याल. तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा !!!
आशा आहे की या उत्तरामुळे तुम्हाला निर्णय घेण्यासाठी थोडीफार तरी मदत होईल आणखी काही शंका असेल तर नक्की विचारा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

8 + 12 =