नाही. ओटीपोटाचा सेक्सशी डायरेक्ट संबंध नसतो. मुलींच्या ओटीपोटात, पोटातील इतर अवयवांप्रमाणे गर्भाशय स्थित असतं. पाळीमध्ये बऱ्याच मुलींच्या ओटीपोटात दुखतं त्याचं कारण गर्भाशयातलं अस्तर, गर्भाशय मुखातून रक्ताबरोबर बाहेर पडण्याची क्रिया चालू असते. सेक्स केल्यानंतर गर्भाशय मुखातून वीर्य गर्भाशयाच्या पिशवीपर्यंत जातं. अंडाशयातून तयार झालेलं अंडं फेलोपीन ट्यूबमध्ये येतं जिथं शुक्रजंतू आणि अंड्यांच मिलन होतं आणि मिलन झालेलं अंडं पुन्हा गर्भाशयाच्या पिशवीत येतं जिथं मूल तयार होण्याची प्रक्रिया चालू होते. त्यामुळं ओटीपोटाचा सेक्सच्या क्रियेशी तसा संबंध नाही तर मूल तयार होण्याच्या क्रियेशी आहे.
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा