प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsAmhi doghehi gore ahot pan yoni, Ling kale ka

1 उत्तर

लैंगिक अवयवांची त्वचा पातळ आणि लवचिक असते त्यामुळे निसर्गतः सगळ्यांचेच लैंगिक अवयव इतर अवयवांच्या तुलनेत काळे असतात. हे अगदी नैसर्गिक आणि निरोगी आहे त्यामुळे काळजी करण्याची कारण नाही.

लैंगिक अवयवांची स्वच्छता राखणे आवश्यक आहे. मात्र बाजारात काही कंपन्या त्यांच्या फायद्यासाठी लैंगिक अवयव गोरे करण्यासाठी काही उत्पादने तयार करत आहेत त्याला बळी पडू नका. लैंगिक अवयवांजवळ अशा क्रीम्स किंवा उत्पादने लावल्याने उलट संसर्ग होण्याचा धोका असतो. शिवाय पैशांचा अपव्यय.

मुळात गोरे म्हणजे सुंदर आणि काळे म्हणजे कुरूप या सौदर्याच्या कल्पनेलाच छेद दिला पाहिजे. आपण निसर्गतः जसे आहोत तसेच खूप सुंदर आहोत.

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 12 =