प्रश्नोत्तरेandosarsan manse kay
andosarsan manse kay asked 9 years ago

1 उत्तर
Answer for andosarsan manse kay answered 9 years ago

मुलगी जन्माला येते तेव्हा तिच्या बीजकोषामध्ये अनेक स्त्री बीजं असतात.  वयात येण्याच्या काळात  बीजकोषातली बीजं परिपक्व किंवा तयार व्हायला सुरुवात होते. त्यानंतर दर पाळीचक्रामध्ये (साधारणपणे २२ ते ३५ दिवसाचे एक चक्र) एक स्त्रीबीज पूर्ण तयार होऊन बीजकोषातून बाहेर येते व बीजवाहिन्यांमध्ये जाते. या प्रक्रियेला अंडोत्सर्जन (Ovulation) म्हणतात. थोडक्यात, स्त्री बीजाची निर्मिती आणि बीजकोशातून ते बाहेर पडणं यालाच  अंडोत्सर्जन  असे (Ovulation) म्हणतात. बऱ्याच जणांचा असं समाज असतो की अन्डोत्सर्जन १४ व्या दिवशीच होतं. पण बहुतेक वेळा ते लवकर किंवा उशीरही होत असतं. लवकरात लवकर म्हणजे अगदी ७ व्या दिवशीही अन्डोत्सर्जन होऊ शकतं आणि काही परीस्थितीत अनेक आठवडे, महिने किंवा वर्षे अन्डोत्सर्जन होतही नाही.    बीजकोशातून बाहेर पडलेलं  हे बीज बीजवाहिनीमध्ये १२-२४ तास जिवंत असते. त्या काळात पुरुष बीजाशी संपर्क आला तर तिथे त्यांचं मिलन होऊन गर्भधारणा होऊ शकते. गर्भ तयार होईल या शक्यतेनुसार गर्भाशयामध्ये अनेक बदल होतात. गर्भाच्या पोषणासाठी गर्भाशयाचं अस्तर जाड होतं.  मात्र पुरुष बीज न आल्यास हे बीज तिथेच विरघळून जाते आणि त्यानंतर 12-16 दिवसांनी गर्भाशयाचं अस्तर गळून पडायला लागतं. म्हणजेच पाळी येते. अधिक माहितीसाठी वेब साईट वरील ‘गर्भधारणा नक्की कशी होते?’ हा लेख वाचा. या लेखासाठी लिंक  https://letstalksexuality.com/conception/

आपले उत्तर प्रविष्ट करा

15 + 14 =