प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsAndrogen चे प्रमाण स्त्रीच्या शरीरात वाढले तर तिच्यामध्ये पुरुषी गुण येतात का?

2 उत्तर

स्त्रियांमध्ये अँड्रोजन (व त्याच्यापासून तयार होणारं प्रोजेस्टेरॉन) चं प्रमाण वाढलं किंवा काही कारणास्तव त्यांनी इंजेक्शनवाटे घेतलं (उदा. वेटलिफ्टर्स) तर त्यांचं शरीर पुरुषी बनायला लागतं. आवाज बदलणं चेहऱ्यावर पिंपल्स येणं, हनुवटी, चेहरा व अंगावर जास्त प्रमाणात केस येणं तसेच अनियमित मासिक मासिक पाळी किंवा मासिक पाळी न येणं, लैंगिक इच्छांमध्ये बदल, लैंगिक इच्छांमध्ये वाढ, असे काही बदल दिसतात.

अँड्रोजनचे किती प्रमाणात वाढले आहे त्यावर लक्षणांची तीव्रता अवलंबून असते. म्हणूनच एखाद्या स्त्रीच्या शरीरात किती प्रमाणात अँड्रोजन हॉर्मोन/संप्रेरक वाढले आहे त्यावर तिच्या लैंगिक आयुष्यावर काय परिणाम होतो हे अवलंबून असेल. त्यामुळे वर नमूद केलेले बदल जर जास्त प्रमाणात दिसून आले तर योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

15 + 13 =