Armpit Attraction. asked 7 years ago

I am 26,Male,Mala mulinchya iter avayavyasobatch armpits baddale khup akarshan ahe. satat me mulinchya ani striyanchya armpits kadhe pahat asto.internet varti armpits che photos ani videos pahat tasan tas ghalto. Armpit Lick karne ani smelling karu vatat. Is this normal how to get rid off it??Or it is ok? Its been long time since i was 19 yrs i am used to it.

2 उत्तर
Answer for Armpit Attraction. answered 7 years ago

लैंगिकता व्यक्त करण्याच्या आपल्या आपल्या पद्धती असू शकतात, आवडी निवडी असू शकतात. कोणाला काय आवडावे किंवा आवडू नये यात इतरंचा काही प्रभाव किंवा हस्तक्षेप असण्याची गरज नाही. लैंगिकतेबाबत तुमच्या खाजगी स्पेस मध्ये तुम्ही कसे व्यक्त होता, काय आवड जोपासता, काय पद्धती उपयोगात आणता हे तुम्हीच ठरवायला पाहिजे. भावा, तू म्हणालास त्या प्रमाणे तुला मुलींचे विशिष्ट अवयव आकर्षित करतात यात मला तरी काही गैर वाटत नाही. हे नॉर्मल आहे. तेव्हा जस्ट रील्यॅक्स.. चील..

पण, एक गोष्ट नॉर्मल नक्कीच नाही. सतत मुलींच्या किंवा स्त्रियांच्या काखेकडे किंवा एकूणच त्यांच्याकडे पाहत रहावे असे जे तुला वाटते त्यात प्रॉब्लेम आहे. एक तर मुली किंवा स्त्रिया सतत पाहण्याच्या, निरखत रहाण्याच्या वस्तू नाहीत. आपल्यावर कोणाची तरी नजर आहे आणि त्यात विशिष्ट अर्थ आहे हे कोणालाच खपणार नाही. तुलाही, नाही का? शिवाय हा त्यांच्या खाजगीपणाचा भंग आहे. पुन्हा हा कायद्याने गुन्हा आहे. अशाने तू गंभीर अडचणीत येऊ शकतोस. तुला ते महागात पडू शकते. तेव्हा यातून मात्र तुला बाहेर पडावेच लागेल. प्रयत्न कर. अवघड वाटत असेल, प्रयत्न करूनही जमत नसेल तर कोणाची तरी मदत घे. हवं असेल तर जवळच्या सायकोलॉजीस्टशी / समुपदेशकाशी संपर्क कर. त्यात काही लाजायचे कारण नाही.

शिवाय भावा, तू म्हणतोस त्या प्रमाणे मुलीच्या काखा पाहण्यासाठी तू इंटरनेट वर तासन तास घालवतोस. आशा आहे त्यामुळे तुझे काही नुकसान होत नसावे. म्हणजे यामुळे जर तू कामाला, अभ्यासाला, तुझ्या जवळच्या व्यक्तींना वेळ देऊ शकत नसशील, तुला स्वतःला ह्याचे दुःख वाटत असेल, सवय लागली आहे असे वाटत असेल तर हीच वेळ आहे सावरण्याची. इथे प्रश्न विचारून तू एक पाऊल टाकलेच आहे याबद्दल तुझे अभिनंदन. पण वर म्हटल्याप्रमाणे मदत हवी असेल तर ती नक्की माग. तुला शुभेच्छा…

आपले उत्तर प्रविष्ट करा

7 + 2 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी